पटोलेंच्या हस्ते आमीर सिद्दिकी यांचा सत्कार

By Admin | Updated: August 19, 2016 01:31 IST2016-08-19T01:31:36+5:302016-08-19T01:31:36+5:30

विदर्भ स्टडी सर्कल गोंदियाच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवा (यूपीएससी) उत्तीर्ण डॉ. आमीर सिद्दिकी

Aamir Siddiqui felicitated at the hands of Pallol | पटोलेंच्या हस्ते आमीर सिद्दिकी यांचा सत्कार

पटोलेंच्या हस्ते आमीर सिद्दिकी यांचा सत्कार

गोंदिया : विदर्भ स्टडी सर्कल गोंदियाच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवा (यूपीएससी) उत्तीर्ण डॉ. आमीर सिद्दिकी तसेच विदर्भ स्टडी सर्कलमधून शासकीय सेवेत झेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. आमिर सिद्दिकी यांचा खा. नाना पटोले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी खा. पटोले होते. अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, सत्कारमूर्ती डॉ. आमिर सिद्दिकी, पोलीस उपनिरीक्षक पी.एस. देशमुख, अमर वऱ्हाडे, त्रिलोक शेंडे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त परिश्रम घेवून अभ्यास करावा व आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. पुढील यूपीएससी परीक्षेत किमान दहा विद्यार्थी उत्तीर्ण व्हावे व जिल्ह्याचे नाव वाढवावे, असे सांगितले. संचालन विनोद माने यांनी केले. आभार प्रविण माने यांनी मानले.
विदर्भ स्टडी सर्कलच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निरीक्षक म्हणून विनोद माने, गोपाल कदम यांनी काम सांभाळले. कार्यक्रमासाठी सुमित कावळे, उषा कठाणे, वैभव खोब्रागडे, सचिन बिजेवार, आशिक बिसेन आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

Web Title: Aamir Siddiqui felicitated at the hands of Pallol