आमगाव आरएचने मिळविले ९४.८ गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:05 IST2017-09-03T21:05:01+5:302017-09-03T21:05:36+5:30

रूग्णालयांचा कायाकल्प करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून कायाकल्प कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

Aamgaon RH won 94.8 points | आमगाव आरएचने मिळविले ९४.८ गुण

आमगाव आरएचने मिळविले ९४.८ गुण

ठळक मुद्देआमगाव ग्रामीण रूग्णालयाचा कायाकल्प : राज्यस्तरीय समिती करणार पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रूग्णालयांचा कायाकल्प करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून कायाकल्प कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील तिरोडा उपजिल्हा रूग्णालय व आमगाव ग्रामीण रूग्णालयाची निवड करण्यात आली होती. या दोन्ही रूग्णालयांची पाहणी गडचिरोली येथील चमूने केली. यात आमगाव ग्रामीण रूग्णालयाला विभागीय चमूने ९४.०८ टक्के गुण दिले असून राज्यस्तरीय चमू आता आमगावच्या ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करणार आहे.
रूग्णालयातील बाह्यरूग्ण सेवा, आंतररूग्ण सेवा, प्रसूती, एक्सरे, तांबीचे प्रमाण, औषध पुरवठा, आकस्मीक आरोग्य सेवा, संदर्भ सेवा अशा विविध सेवा कशा पद्धतीने दिल्या जातात. तसेच आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपलब्ध असलेली साधने, रूग्णालयाचे स्वरूप, रूग्णालयात करण्यात आलेल्या भौतिक सुविधा या सर्व बाबींकडे विभागीय समितीने लक्ष दिले. मागील वर्षी ७२ टक्के गुण घेणारे हे रूग्णालय यंदा ९४.०८ वर पोहचले आहे. पुन्हा जोमाने कार्य करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविण्याचा माणस ठेवून या रूग्णालयात काम सुरू आहे.
आमगाव येथील ग्रामीण रूग्णालय २००४ च्या सुमारास तयार करण्यात आले. या रूग्णालयात साधी आरोग्य सेवा मिळत नव्हती. रूग्णालयात सन २०११ पासून प्रसूतीच केली जात नव्हती. मात्र सन २०१६-१७ मध्ये १३४ किरकोळ शस्त्रक्रिया, १२ कुटुंब नियोजन व हायड्रोसील शस्त्रक्रीया, २९ प्रसूती, २२८ एक्सरे व १७ महिलांना तांबी बसविण्यात आली.
तर सन २०१७-१८ या वर्षात ९१ किरकोळ शस्त्रक्रिया, ३ कुटुंब नियोजन व हायड्रोसील शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून साडे चार महिन्यांत ७२ प्रसूती करण्यात आल्या आहेत. त्यातील ५० महिलांना तांबी बसविण्यात आली. ११८ रूग्णांचे एक्सरे काढण्यात आले. येथील अधिक्षक डॉ. शोभना सिंह यांच्या नेतृत्वात आमगाव रूग्णालयाचा कायाकल्प होत आहे.

Web Title: Aamgaon RH won 94.8 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.