शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बॅटरी चोरीच्या संशयातून पोलीस शिपायाच्या भावाचा खून; दोघांवर गुन्हा दाखल 

By नरेश रहिले | Updated: October 19, 2022 18:45 IST

बॅटरी चोरी केल्याच्या संशयावरून पोलीस शिपायाच्या भावाची हत्या करण्यात आली आहे. 

गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांत कार्यरत पोलीस शिपायाच्या भावाला बॅटरी चोरी केल्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४० वाजता रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आंबेडकर चौक कुडवा येथे घडली. भुमेंद्र लिलाधर मेश्राम (३२) रा. कुडवा असे मृताचे नाव आहे.

बोलेरोत बसवून नेलं बिअर शॉपीच्या दुकानात रावणवाडी पोलीस ढाण्यात कार्यरत पोलीस शिपाई नरेंद्र लिलाधर मेश्राम (३६) यांनी रामनगर पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा लहान भाऊ भुमेंद्र लिलाधर मेश्राम (३२) रा. कुडवा हा १५-२० दिवसापासून मनिष मिताराम बघेले (३४) रा. कुडवा याच्याकडे वायफाय केबल कनेक्शनचे काम मजुरीने करीत होता. बॅटरी चोरीचा संशय घेत आरोपी मनिष बघेले व भावीन पारधी रा. कुडवा यांनी सायंकाळी ४.४० वाजता आंबेडकर चौक कुडवा येथे लाथाबुक्यांनी, थापडांनी, ढकलत ढकलत मारपीट केली. यात भुमेंद्र लिलाधर मेश्राम (३२) चा मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कुरसुरी करीत आहेत. आरोपी मनिष बघेले व भावीन पारधी याच्या सोबत जबरदस्तीने भुमेंद्रला आपल्या बोलेरो एमएच ३५ पी ४०९८ मध्ये बसवून बियर शॉपीच्या दुकानात घेवून गेला. त्याला तेथेही मारहाण केली.

दिराच्या मृत्यूची बातमी वहिणीला दिलीया प्रकरणातील तक्रारकर्ते पोलीस शिपाई नरेंद्र मेश्राम (३६) यांनी आपल्या पत्नीला फोन करून आपला लहान भाऊ घरी आला का याची विचारणा केल्यावर त्यांनी तो आला नाही असे सांगितले. काही वेळाने संगीता मेश्राम यांनी नरेंद्र यांना दोन इसम घरी आले आणि भुमेंद्रच्या मृत्यू झाल्याची बातमी दिल्याचे सांगितले. 

 

 

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस