खमारी येथील ८ हजाराचे साहित्य पळविणाऱ्या एकाला अटक
By नरेश रहिले | Updated: January 30, 2024 19:13 IST2024-01-30T19:12:48+5:302024-01-30T19:13:03+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: चोरी केलेली एलईडी विक्रीच्या तयारीत होता

खमारी येथील ८ हजाराचे साहित्य पळविणाऱ्या एकाला अटक
गोंदिया: खमारीच्या दुर्गाटोली येथील राजीव अंबादे यांच्या घराचे कुलूप तोडून ४ नोव्हेंबर २०२३ रोजी एलईडी, सिल्वर रंगाचा कॅमेरा व इतर साहित्य असा ७ हजार ८०० रूपयाचा माल चोरी केलेल्या आरोपी खुशाल मोतीराम बहेकार (२९) रा. खमारी याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३० जानेवारी रोजी पकडले. त्याच्या जवळून चोरीला गेलेला माल जप्त करण्यात आला.
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खमारीच्या दुर्गाटोली येथील राजीव अंबादे यांच्या घरून एलईडी, कॅमेरा व इतर साहित्य चोरी केल्यामुळे यासंदर्भात गोनदिया ग्रमाीण पोलिसात भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपीला तीन महिन्याने पकडण्यात आले. त्याच्या जवळून एलईडी किंमत ५ हजार, एक गॅस सिलींडर किंमत २ हजार, एक कॅमेरा ५०० रूपये, एक लोखंडी हतोडी किंमत ३०० रूपये, एक लोखंडी कटोनी किंमत १०० रुपये असा एकूण किंमत ७ हजार ९०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. ती एलईडी विक्री करण्याचा त्याचा बेत होता.
ही कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, सहाय्यक फौजदार अर्जुन कावळे, पोलीस हवालदार भुवनलाल देशमुख, राजेंद्र मिश्रा, इंद्रजित बिसेन, संतोष केदार, तुलसिदास लुटे यांनी केली आहे.