रेल्वे समोर उडी मारून एका व्यक्तीची आत्महत्या; कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2022 22:49 IST2022-08-21T22:49:18+5:302022-08-21T22:49:23+5:30
या घटनेनंतर रेल्वे स्थानकावर काही वेळ तारांबळ उडाली होती.

रेल्वे समोर उडी मारून एका व्यक्तीची आत्महत्या; कारण अस्पष्ट
गोंदिया - धावत्या रेल्वे गाडी समोर उडी घेवून प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. किसन मडावी( ४५) रा. भजेपार असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार भजेपार येथील निवास किसन मडावी हा रात्री ८ वाजताच्या सुमारास तिरोडा रेल्वे स्टेशन प्लँटफॉर्म नंबर दोनवर आला. त्याने कुणालाही काही कळण्यापुर्वी त्याने धावत्या गाडी समोर उडी घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर रेल्वे स्थानकावर काही वेळ तारांबळ उडाली होती. दरम्यान रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला. दरम्यान किसनच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.