शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

बाराभाटी शेतशिवारात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ; पॅक हाउस व पोल्ट्री फार्मची तोडफोड, धानाची नासाडी  

By अंकुश गुंडावार | Updated: December 13, 2023 19:11 IST

तब्बल सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीच्या कळपाची तालुक्यात एंट्री झाली आहे.

अर्जुनी मोरगाव : तब्बल सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीच्या कळपाची तालुक्यात एंट्री झाली आहे. सोमवारी या कळपाने भरनोली परिसरात शेतपिकांचे नुकसान केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा खैरी सुकळी, बाराभाटी परिसराकडे वळविला. या कळपाने शेतशिवारात बुधवारी रात्री धुमाकूळ घातला. यात नुकसान झाल्याची माहिती आहे. धुमाकूळाची मालिका सुरूच आहे. या कळपाने कवठा बोळदे मार्गे काळीमाती जंगलाकडे कूच केल्याची माहिती देऊन वन विभागाने नजीकच्या गावात दवंडी देऊन रहिवाशांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.

२० ते २२ च्या समूहात असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाची गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा मार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एंट्री झाली. राजोली, भरनोली, प्रतापगड, काळीमाती जंगल मार्गे खैरी, बाराभाटी परिसरात मंगळवारी रात्री दाखल झाले. ऐन धान मळणीच्या दिवसात कळप दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह वन विभागाला धडकी भरली आहे. नऊ डिसेंबरच्या रात्री राजोली, भरनोली येथील नीलकंठ हारामी यांच्या शेतात पाच एकरांतील धानाच्या पुजन्याची नासधुस करून हा हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला होता. १२ डिसेंबर रोजी पुन्हा या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात एंट्री केली. बाराभाटी येथे हत्तीच्या कळपाने पुरणलाल बेलखोडे, भोजराज बेलखोडे या शेतकऱ्यांचे पॅक हाउस व गांडूळ खत इमारतीची नासधूस केली. या इमारतीमध्ये ठेवलेल्या धानाच्या पोत्याचे नुकसान केले. तसेच, गौरव बेलखोडे यांच्या शेतात असलेल्या पोल्ट्री फार्मची नासधुस केली. आवारभिंतीची जाडी, सिमेंटचे खांब, केळी व नारळाची झाडे सुद्धा उद्ध्वस्त केली. हेमराज बेलखोडे, किशोर बेलखोडे, महेश बेलखोडे, भागवत बेलखोडे यांच्याही धानाच्या पोत्यांची नासधुस करून शेतातील पोपट, हळद, मिरची, तूर व उन्हाळी रोपांचे नुकसान केले आहे.

राजकुमार बडोले यांनी केली नुकसानीची पाहणीमाजी मंत्री राजकुमार बडोले, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, नवेगावबांधचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.जी. अवगान यांनी घटनास्थळी भेट दिली. क्षेत्र सहायक व्ही.एम. करंजेकर, एल.व्ही. बोरकर, व्ही.एल. सोयाम, एस.टी. राणे यांनी नुकसानग्रस्त परिसरांची पाहणी केली व पंचनामे तयार केले. शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरणसध्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतशिवारात धान कापणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी सकाळपासून शेतावर असतात. मात्र, हत्तींच्या कळपाने या परिसरात धुमाकूळ घालून धानाच्या पुंजण्याचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वन विभागाची चमू हत्तींच्या मागावरगडचिरोली जिल्ह्यात परत गेलेला हत्तींचा कळप पुन्हा अर्जुनी मोरगाव तालुक्यात मंगळवारी (दि.१२) रात्री अर्जुनी मोरगाव तालुक्यात दाखल झाला. या कळपाने खैरी सुकळी, बाराभाटी परिसरातील शेतशिवार धुमाकूळ घालून धान पिकाचे नुकसान केले. त्यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, हत्तींच्या हालचालींवर वन विभागाची चमू नजर ठेवून आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया