शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

घरी मीटर नसलेल्या शेतकऱ्याला १६ हजारांचे बिल; महावितरण बेशुद्धावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 17:46 IST

कालीमातीच्या सहायक अभियंत्याचा प्रताप : कातुर्लीचा शेतकरी आला संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : झीरो पोल योजनेंतर्गत कनेक्शन देण्यासाठी महावितरणच्या कालीमाती येथील सहायक अभियंत्याने १५ हजार रुपये जानेवारी २०२३ मध्ये घेतले. त्यानंतर प्रतिज्ञापत्र ऑनलाइन करण्यास सांगितले. महावितरण, महसूलची नाहरकत हे सर्वच करण्यास सांगितले. मात्र अद्यापही ना खांब लागले, ना मीटर लागले नसतानाही शेतकऱ्याला १६ हजार ३९० रुपयांचे बिल पाठविण्यात आले. आता तो सहायक अभियंता ती योजना बंद झाल्याचे सांगून आपले हात झटकत आहे. परिणामी तो शेतकरी संकटात आला आहे.

आमगाव तालुक्यातील कातुर्ली येथील प्रेमलाल अनंतराम बिसेन यांची शेती कातुर्ली गावात आहे. त्यांना महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने २०२३ मध्ये महाराष्ट्र कृषी धोरणाअंतर्गत झीरो पोल योजनेंतर्गत शेतात ट्रान्सफॉर्मर लावून मिळतो. त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात संपर्क करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार प्रेमलाल बिसेन यांनी कालीमाती येथील महावितरणच्या उपकेंद्रात जाऊन सहायक अभियंता अनंत प्रसादकर यांची भेट घेतली. प्रसादकर यांनी त्यांना यासाठी १५ हजार रुपये लागतील असे सांगितले. शेतकरी बिसेन यांनी १५ हजार रुपये सहायक अभियंत्याला जानेवारी २०२३ मध्ये दिले. त्यानंतर झीरो डीपी अंतर्गत कनेक्शन मिळेल अशी हमी दिली. त्यासाठी प्रतिज्ञापत्र करून महावितरण आणि महसूल विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले.

शेतकऱ्याने तसेच केले. सर्व प्रक्रिया महावितरणच्या पोर्टलवर ऑनलाइन केली. परंतु, ट्रान्सफॉर्मर, खांब आणि मीटरदेखील लागले नाही. परिणामी प्रेमलाल बिसेन यांनी पुन्हा कालीमाती कार्यालयात प्रसादकर यांची भेट घेतली. आता मात्र सहायक अभियंत्याने ती योजना बंद झाली असे सांगितले. असे असताना मात्र त्या शेतकऱ्याला महावितरणने १६ हजार ३९० रुपयांचे बिल धाडले. कसलीही वीज खर्च न करता आणि खांब तसेच मीटर देखील नसताना हातात पडलेले विजेचे बिल बघून त्या शेतकऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली. सहायक अभियंत्याला दिलेले १५ हजारही गेले, वर्षभरात मारलेले हेलपाटे देखील वाया गेले असताना न वापरलेल्या विजेचेदेखील बिल आले.

उंटावरुन हाकल्या शेळ्याशेतात किंवा घरी विद्युत मीटर बसवायचे असल्यास डिमांड भरण्यापूर्वी आणि त्यानंतर स्थानिक लाइनमनने सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. त्यानंतरच सर्व प्रक्रिया केली जाते. मात्र, या प्रकरणात लाइनमन आणि सहायक अभियंत्याने कसलीही शहानिशा न करता डिमांड काढली. आता मीटर कार्यालयात पडून असतानाही शेतकऱ्याला १६ हजारांचे बिल देण्यात आले. हा प्रकार शुद्ध फसवणुकीचाच आहे.

"शेताला सिंचन व्हावे म्हणून शासनाची योजना असल्याने महावितरणच्या कार्यालयाने जे सांगितले ते केले. त्यांना पैसे दिले. सर्व कागदपत्रांची जमवाजमव केली. मात्र वर्ष लोटून मीटर लागले नाहीत. खांब लागले नसताना पुन्हा १६ हजारांचे बिल देण्यात आले. वारंवार कार्यालयाच्या चकरा मारून गोलगोल फिरविण्यात येत आहे."- प्रेमलाल बिसेन, शेतकरी, कातुर्ली

 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीgondiya-acगोंदिया