९.८४ कोटींच्या रस्ते बांधकामाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST2021-03-07T04:26:12+5:302021-03-07T04:26:12+5:30
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील नऊ कोटी ८४ लाख रूपयांच्या प्रस्तावित रस्ते बांधकामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. ...

९.८४ कोटींच्या रस्ते बांधकामाला मंजुरी
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील नऊ कोटी ८४ लाख रूपयांच्या प्रस्तावित रस्ते बांधकामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. यांतर्गत क्षेत्रातील ६ गावांतील १२.८३ किलोमीटर अंतराच्या ग्रामीण जोड रस्त्यांचे काम केले जाणार आहे.
७ जून रोजी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशावरून तत्कालीन ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या नऊ कोटी ८४ लाख रूपयांच्या रस्ते बांधकामाला मंजुरी दिली होती. यात गावच्या मधातून जाणाऱ्या रस्त्यांच्या सिमेंटीकरणाची तरतूद होती. मात्र जून महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व त्यानंतर कोरोना ल़ॉकडाऊनमुळे निविदा प्रक्रियेत उशीर झाला. अशात माजी आमदार अग्रवाल यांनी विद्यमान ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून त्यांना निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरूवात करण्याबाबत मागणी केली. त्यांच्या निर्देशावरून या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेश देत कामाला सुरूवात होणार आहे. या नऊ कोटी ८४ लाख रूपयांच्या निधीतून क्षेत्रातील ६ गावांतील १२.८३ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे काम होणार आहे. यामध्ये नंगपुरी मुर्री-शेंद्रीटोला या २.२४ किमी रस्त्याचे १५५.४१ लाख रूपयांतून, भागवतटोला-हिवरा या २.३५ किलोमीटर रस्त्याचे १६४.२१ लाक रूपयांतून, चुटिया-रापेवाडा या ३.९५ किलोमीटर रस्त्याचे ३४५.६९ रूपयांतून, ढाकणी-फतेपूर या १.११ किलोमीटर रस्त्याचे ८८.६७ लाख रूपयांतून, मुर्री चुटिया रोड-लोधीटोला या १.६३ किलोमीटर रस्त्याचे १३०.२२ लाख रूपयांतून तर तेढवा-मरारटोला या १.५५ किलोमीटर रस्त्याचे १९.८० लाख रूपयांतून बांधकाम होणार आहे.