९ विद्यार्थ्यांनी पटकाविला ब्लॅकबेल्ट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST2021-03-21T04:27:39+5:302021-03-21T04:27:39+5:30
या परीक्षेत जिल्ह्यातील १० खेळाडूंनी भाग घेतला होता. या परीक्षेचे मुख्य परीक्षक ७- डॉन ब्लॅकबेल्ट, इंटरनॅशनल इन्स्टर राजन पिल्ले, ...

९ विद्यार्थ्यांनी पटकाविला ब्लॅकबेल्ट ()
या परीक्षेत जिल्ह्यातील १० खेळाडूंनी भाग घेतला होता. या परीक्षेचे मुख्य परीक्षक ७- डॉन ब्लॅकबेल्ट, इंटरनॅशनल इन्स्टर राजन पिल्ले, ४-डॉन ब्लॅकबेल्ट इंटरनॅशनल रेफरी सुनील शेंडे, ३-डॉन ब्लॅकबेल्ट गौतम गोडबोले होते. परीक्षेत काता, टेक्निकल फायटिंग, डेमो, ब्रेकिंग, इत्यादी प्रकारांत कठोर परिश्रम करून प्रीतकुमार नागपुरे, सुजल नागपुरे, राहुल रहांगडाले, दर्शन येरपुडे, चंद्रशेखर बोहणे, अमन नदेश्वर, निशांत भेंडारकर, ममता गायधने व धनश्री इंगळे यांनी ब्लॅकबेल्ट पटकाविला. त्यांचे जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष संजय नागपुरे, तालुका क्रीडा समिती अध्यक्ष राजेश असाटी, रविकांत जयस्वाल, डॉ. संदीप मेश्राम, प्रदीप मेश्राम, सुरेश शहारे, लोकेश चौरवार, ज्ञानिराम भेदरकर, विकेश मेश्राम, दीपक घरजारे, खुशाल पिंजारघरे, आकाश शहारे, वलभ शेंडे, निशा पांडे, माधुरी बावनकर तसेच शहरवासीयांनी कौतुक केले आहे.