९ ला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गोंदियात

By Admin | Updated: February 5, 2017 00:08 IST2017-02-05T00:08:56+5:302017-02-05T00:08:56+5:30

गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे शिक्षणमहर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या १११ व्या जयंती सोहळ्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकांनी गौरव

9 Bihar Chief Minister Nitish Kumar Gondiyaat | ९ ला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गोंदियात

९ ला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गोंदियात

मनोहरभाई जयंती सोहळा : विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकांनी होणार सन्मान
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे शिक्षणमहर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या १११ व्या जयंती सोहळ्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकांनी गौरव करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार येत्या ९ फेब्रुवारीला गोंदियात येत आहेत.
या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून जनता दल (युनायटेड)चे राष्ट्रीय प्रवक्ता माजी खासदार के.सी.त्यागी, माजी खा.पवन वर्मा, भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार बाईचुंग भुटीया, विद्यमान कर्णधार सुनील छेत्री यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ३.३० वाजता स्थानिक डी.बी. सायन्स कॉलेजच्या प्रांगणात हा सोहळा होणार आहे. यात दरवर्षीप्रमाणे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मनोहरभाई पटेल सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन गौरविले जाणार आहे. या सोहळ्याला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गुजराती राष्ट्रीय केवलणी मंडळ, स्व.मनोहरभाई पटेल स्मृति समितीचे अध्यक्ष माजी आ.हरिहरभाई पटेल तसेच मनोहरभाई पटेल अकादमी व गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 9 Bihar Chief Minister Nitish Kumar Gondiyaat