९५ अपंग मुलांना कॅलिपर्सचे बळ

By Admin | Updated: August 9, 2015 01:52 IST2015-08-09T01:52:37+5:302015-08-09T01:52:37+5:30

सर्वसामान्य मुलांप्रमाणे अपंग मुलांनाही सन्मानाने समाजात वावरता यावे याकरिता सर्व शिक्षा ..

9 5 Force of calipers with disabled children | ९५ अपंग मुलांना कॅलिपर्सचे बळ

९५ अपंग मुलांना कॅलिपर्सचे बळ

सर्व शिक्षा अभियानाचा उपक्रम : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
गोंदिया : सर्वसामान्य मुलांप्रमाणे अपंग मुलांनाही सन्मानाने समाजात वावरता यावे याकरिता सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून मोजमाप शिबिरात कॅलीपर्स करीता निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील ९५ अपंग मुलांना कॅलीपर्स वाटप करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन जि.प. अध्यक्षा उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले. यावेळी मुकाअ दिलीप गावडे, सभापती पी.जी. कटरे, विमला नागपुरे, छाया दसरे व सदस्य शोभेलाल कटरे, किशोर तरोणे, रमेश लिल्हारे, जियालाल लोणारे, ललिता चौरागडे, वालदे, रजनी गौतम इत्यादी जि.प. सदस्य व डॉ. सुमीत शर्मा, डॉ. अमन भांडारकर, शिक्षणाधिकारी घनशाम पाटील व उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी उपस्थित होते.
अपंगत्व शिक्षण घेताना अडथळा समोर येऊ नये याकरिता सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण विभागांतर्गत विविध साहित्याचे वाटप करण्यात येते. यामध्ये प्रथम साहित्याकरिता निवडण्यात आलेल्या मुलीचे केंद्र शासनाच्या अलिम्को या संस्थेच्या तज्ञांद्वारे मोजमाप करण्यात येते.
त्यानंतर सर्व निवडण्यात आलेल्या अपंग मुलांना साहित्य वाटप करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून काल जैन कुशल भवन येथे आयोजित शिबिरात जिल्ह्यातील ९५ अपंग मुलींना कॅलिपरचे वाटप करुन पालकांना वापरा संबंधीचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमात जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुकाअ यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करतेवेळी जिल्हा परिषद अपंगांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगून प्रत्येक योजना प्रभाविपणे राबविण्यात येईल याची ग्वाही दिली. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी घनश्याम पाटील, संचालन दिलीप बघेले तर आभार विभाग प्रमुख विजय ठोकणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी समन्वयक विलास मलवार, विस्तार अधिकारी नीलकंठ सिरसाठे, समन्वयक गजानन धावडे, थानसिंह बघेले, बुद्धभूषण सोनकांबळे, संजेश मते, प्रदीप वालदे, राजकुमार गौतम, मुक्ता पोगळे, विनिता यादव, दीपा बिसेन, आम्रपाली उके, चंद्रकुमार धुवारे, सतीश गजभिये, अमोल डोंगरदिवे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 9 5 Force of calipers with disabled children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.