९३ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचा लाभ

By Admin | Updated: May 30, 2016 01:38 IST2016-05-30T01:38:47+5:302016-05-30T01:38:47+5:30

वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने मुरदोली या जंगल प्रभावित गावातील ९३ लाभार्थ्यांना एल.पी.जी. गॅस कनेक्शनचे वितरण नुकतेच करण्यात आले.

9 3 Benefits of Gas Connection to Beneficiaries | ९३ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचा लाभ

९३ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचा लाभ

गोरेगाव : वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने मुरदोली या जंगल प्रभावित गावातील ९३ लाभार्थ्यांना एल.पी.जी. गॅस कनेक्शनचे वितरण नुकतेच करण्यात आले.
वनविभागामार्फत मुरदोली येथील ९३ अनुसूचित जातीजमाती व ओबीसी प्रवर्गातील कुटुंबांना गॅसचे कनेक्शन सहायक वनरक्षक यु.टी. बिसेन, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एस. कदम, विजय बोपचे, ओ.व्ही. आग्रे, सरपंच ससेंद्र भगत, आर.एन. बहेकार, दिलीप मेश्राम, रोशन कटरे, एस.के. दिघोरे, वासुदेव बोपचे, चंद्रशेखर भुरेवार, ताराचंद धुर्वे, हरिचंद पटले यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
यावेळी सहायक वनसंरक्षक यु.टी. बिसेन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जंगलव्याप्त गावांमधून वनांची कटाई थांबण्यासाठी शासनाद्वारे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. जाळण्यासाठी लाकडाचा वापर न करता गॅसचा वापर करून आपली दैनंदिन गरज पूर्ण करता यावी म्हणून मोफत गॅसचे वितरण करण्यात आले. गावकऱ्यांना जंगलतोड थांबवून गॅसचा वापर करावा. वनाचे संरक्षण करावे. पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी जंगल वाढ करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सरपंच ससेंद्र भगत यांनी मुरदोली, जांभूळपाणी, गराडा, सोदलागोंदीचे सर्व वनग्राम योजनेत समाविष्ट वनांचे संरक्षण करीत असल्याचे सांगितले. संचालन रोशन कटरे यांनी केले. आभार एस.टी. दिघोरे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: 9 3 Benefits of Gas Connection to Beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.