८४ नळ योजनांना मिळाली मंजुरी

By Admin | Updated: June 1, 2015 01:41 IST2015-06-01T01:41:49+5:302015-06-01T01:41:49+5:30

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आणखी ८४ नळ योजनांना मंजूरी मिळाली आहे.

84 Null schemes get sanctioned | ८४ नळ योजनांना मिळाली मंजुरी

८४ नळ योजनांना मिळाली मंजुरी

कपिल केकत गोंदिया
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आणखी ८४ नळ योजनांना मंजूरी मिळाली आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाने मागील वर्षी दिलेल्या ९० योजनांनंतर आणखी ८४ योजना आता गावांत साकारणार आहेत. यात सर्वाधिक २० योजना तिरोडा तालुक्यातील आहेत. तर स्थानिक स्तरावर मंजूरी मिळालेल्या या योजनांमधील सुमारे ३० योजना राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
पाणी जीवनाश्यक वस्तू असतानाच सर्वांना पाणी ही शासनाची मूलभूत जबाबदारी व नागरिकांचा अधिकार आहे. मात्र उन्हाळ््यात जिल्ह्यातील कित्येक गावांत पाणी पेटते. पाण्याअभावी गावकऱ्यांना इतरत्र भटकावे लागत असल्याचेही प्रकार जिल्ह्यात घडतात. याचे कारण आजही कित्येक गावांत नळ योजना नाही, तर काही गावांत वाढलेल्या लोकसंख्येमुळे असलेली योजना पुरेपूर पाणी पुरवठा करू शकत नाही.
या सर्व प्रकारांवर जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभाग नजर ठेवून आहे. यातूनच जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई या प्रकारावर आळा घालण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सन २०१४-१५ मध्ये ९० योजना तयार केल्या. मात्र यानंतरही कित्येक गावांत नळ योजना नसल्याने किंवा वाढीव योजना देण्याची गरज असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सन २०१५-१६ मध्ये ८४ गावांत नळ योजना देण्याचा प्रस्ताव माडण्यात आला होता. या ८४ योजनांना स्थानिक स्तरावर मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे यातील काही योजनांतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
स्थानिकस्तरावर या योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यातील सुमारे ३० योजना दरडोई निकषात बसत नसल्याने त्यांना मंजुरी देणे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे.
करिता या योजनांना राज्य शासनाकडून मंजुरी घ्यावी लागते. त्यानुसार सुमारे ३० योजना राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवकुमार शर्मा यांनी सांगीतले.
जिल्ह्यातील या गावांना मिळणार नळ योजना
आमगाव : चिंताटोला, कोसमटोला, गिरोला, जामखारी, तिगाव. अर्जुनी-मोरगाव :चिचोली (जुनी), चिचोली (नवी), परसोडी र., पांढरवानी माल., तिडका, वडेगाव रेल्वे, खांबी, अरततोंडी, झाशीनगर, येरंडी, कन्हाळगाव नवेगावबांध. देवरी : आमगाव आदर्श, देवरी, हरदोली, मुरपार. गोंदिया : धामनगाव, किडंगीपार, मजीतपूर, एमआयडीसीटोली, मुंडीपार, मुंडीपारटोला, पारडीबांध, शिरपूर, शिवनी. गोरेगाव : दवडीपार, मलपुरी, मोहगाव तिल्ली, धुंदाटोला, बोरीटोला, पालेवाडा, पुरगाव. सडक-अर्जुनी : घाटबोरी, घटेगाव, गिरोला, खुर्शीपार, म्हसवानी, घाटबोरी तेली, डव्वा, बाम्हणी (खडकी), मुरपार, लेंडेझरी, मुंडरीटोला, सितेपार. सालेकसा : गिरोला, इसनाटोला, सोनारटोला, धनसुआ, कोटजंभुरा, मोकासीटोला, मुंडीपार, राजपूतटोला, पानगाव, बच्चनटोला, नवेगाव, निंबा, पोवारीटोला, तिरोडा : अत्री, बयवाडा, भजेपार, चांदोरी बू., चिखली, डब्बेटोला, धादरी, किडंगीपार, काचेवानी, टिकारामटोला, केसलवाडा, नांदलपार, मलपुरी, मनोरा, मुरमाडी, मुरपार, नवेगाव खु.,पालडोंगरी, खेडेपार, येडमाकोट.

Web Title: 84 Null schemes get sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.