८३ हजारांचा मोहा सडवा जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST2021-03-21T04:27:37+5:302021-03-21T04:27:37+5:30
तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आपली कंबर कसली असून त्यात आता होळी येत असल्याने पोलिसांनी विशेष ...

८३ हजारांचा मोहा सडवा जप्त ()
तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आपली कंबर कसली असून त्यात आता होळी येत असल्याने पोलिसांनी विशेष अभियान राबवित आहे. याच मोहिमेंतर्गत संत रविदास वॉर्डात धाड टाकली. यात पोलिसांनी दोघांकडून ८३ हजार २०० रूपयांचा मोहा सडवा जप्त केला आहे.
शनिवारी (दि.२०) सकाळी ६.३० वाजतापासून राबविलेल्या या धाडसत्रात पोलिसांनी संत रविदास वॉर्डात ७ दारू विक्रेत्यांवर धाड टाकली होती. यातील कलीम गफुरखा पठाण (रा. संत रविदास वॉर्ड) यांच्या घरातून २५ प्लास्टिक चुंगडीत ४० हजार रूपये किमतीचा मोहा सडवा जप्त केला. तर कविता सेवकराम तांडेकर हिच्या घरातून २७ प्लास्टिक चुंगडीत ४३ हजार २०० रूपये किमतीचा ५४० किलो सडवा मोहाफुल जप्त केला. अशा प्रकारे एकूण ८३ हजार २०० रूपयांचा मोहा सडवा पोलिसांनी जप्त केला आहे. या दोघांविरुद्व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सपोनि ईश्वर हनवते, उपनि केंद्रे, नापोशी बर्वे, वाडे, पोशी महेंद्र अंबादे, महिला पोशी माधुरी शेंडे, नंदा बडवाईक यांनी केली.