८,२९२ रुपयांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:27 IST2021-04-13T04:27:21+5:302021-04-13T04:27:21+5:30

गोंदिया : कोरोना उद्रेकामुळे दारू विक्री बंद करण्यात आली असल्याने अवैध दारू विक्रेते फोफावू लागले असून, सर्रास दारू विक्री ...

8,292 worth of liquor was seized | ८,२९२ रुपयांची दारू पकडली

८,२९२ रुपयांची दारू पकडली

गोंदिया : कोरोना उद्रेकामुळे दारू विक्री बंद करण्यात आली असल्याने अवैध दारू विक्रेते फोफावू लागले असून, सर्रास दारू विक्री सुरू केली आहे. अशा ९ दारू विक्रेत्यांना दणका देत डुग्गीपार पोलिसांनी आठ हजार २९२ रुपयांची जप्त केली आहे.

अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांगडे यांनी रविवारी (दि.११) चार पथक तयार केले. या पथकांनी हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांना दणका देत नऊ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडील आठ हजार २९२ रुपयांची दारू जप्त केली. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वांगडे, सफौ खेदराज राऊत, हवालदार हरीशचंद्र शेंडे, अमित मुझारिया, रविशंकर चौधरी, नायक सुनील भैसारे, सुनील उईके, सुरेश चंद्रिकापुरे, उत्तम दहीवले, अनिल पटीये, घनश्याम मु‌ळे, शिपाई महेश धुर्वे, महिला शिपाई रागिनी निखारे, धर्मशीला भोयर, नीता कमामे, सुषमा मेश्राम यांनी ही कामगिरी केली आहे.

Web Title: 8,292 worth of liquor was seized