८२२ उमेदवारांची आज लेखी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 00:46 IST2017-04-16T00:46:30+5:302017-04-16T00:46:30+5:30
जिल्ह्याची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २२ मार्चपासून सुरू झाली आहे. एकूण ४४ पोलीस शिपाई पदाच्या जागासाठी ही भरती होत आहे.

८२२ उमेदवारांची आज लेखी परीक्षा
गोंदिया : जिल्ह्याची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २२ मार्चपासून सुरू झाली आहे. एकूण ४४ पोलीस शिपाई पदाच्या जागासाठी ही भरती होत आहे. पाच जागा अनुकंपा व बँड मॅनसाठी आहेत.
उरलेल्या ३९ जागांसाठी तब्बल ६ हजार ९५ उमेदवारांनी अर्ज केले होते. यात १२४८ महिला तर ४ हजार ८४७ पुरूष उमेदवारांचा समावेश होता. यापैकी ७८१ महिलांनी तर ३०९८ पुरूषांनी शारीरिक चाचणी दिली आहे. यापैकी लेखी परीक्षेसाठी १६७ महिला व ५८७ पुरूष तर बँड मनसाठी ६८ लोक परीक्षा देणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. ३९ जागांपैकी ११ जागा महिलांसाठी असून या जागांसाठी १ हजार २४८ महिलांनी अर्ज केले आहे. त्यातील ७८१ महिलांनी शारिरिक चाचणी दिली असून ४६७ महिला उमेदार गैरहजर किंवा त्यांना तृट्यांअभावी चाचणी देता आली नाही. २८ पुरूषांच्या जागांसाठी ४ हजार ८४७ पुरूषांनी अर्ज केले होते. त्यातील ३ हजार ९८ पुरूषांनी शारिरिकक चाचणी दिली तर १ हजार ७४९ उमेदवार गैरहजर किंवा त्यांना तृट्यांअभावी चाचणी देता आली नाही.
सदर भरतीवर करडी नजर ठेवण्यासाठी २६ सीसीटीव्ही कॅमेरे तर २२ व्हिडीओ कॅमेरे बसविले होते. लेखी परीक्षा १६ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ७.३० वाजता दरम्यान घेण्यात येणार आहे.
त्यासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र सर्व उमेदवारांना सकाळी ५ वाजता पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात रिपोर्र्टींगसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेवरही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.या परीक्षेसाठी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)