शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

२३ शेततळ्यांतून ८० हेक्टर सिंचन

By admin | Updated: August 5, 2016 01:36 IST

राज्यात येत्या पाच वर्षात २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा संकल्प राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून केला आहे.

उत्पादनात वाढ होण्यास मदत : जलयुक्त शिवार अभियानातून सिंचनाची सोय गोंदिया : राज्यात येत्या पाच वर्षात २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा संकल्प राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून केला आहे. राज्यात या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. लोकसहभागातून कामे होत आहेत. नैसर्गिक स्त्रोतांचे पुनरूज्जीवन करण्यात हे अभियान महत्वपूर्ण ठरले आहे. या अभियानातून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली असून उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला येथे २३ शेततळी शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानातून तयार केल्यामुळे खोसेटोला हे शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान या महत्वाकांक्षी योजनेत इथल्या शेतकऱ्यांनी सहभागी होवून शेतीसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण केली आहे. खोसेटोला गावचे २९४.६० हेक्टर क्षेत्र हे पिकाखाली असून भात हे येथील प्रमुख पीक आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात २६४ हेक्टरवर धान पीक घेण्यात येते. परंतु रबी पिकांसाठी सिंचनाची सोय नसल्यामुळे इथला शेतकरी मुख्यत: खरीप हंगामावर अवलंबून शेती करतो. सन २०१५-२०१६ या वर्षात राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्र म सुरु केला. खोसेटोल्याच्या ग्रामस्थांना तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी जलयुक्त शिवार अभियानाचे महत्व पटवून दिले. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेतीतून अधिक उत्पन्न घेणे शक्य नसल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. पहिल्याच वर्षी २०१५-१६ मध्ये खोसेटोला गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानासाठी करण्यात आल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. तालुका कृषी अधिकारी वावधने यांनी शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनासाठी शेततळ्याचे महत्व पटवून दिले. गावातील तब्बल २३ शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानातून आपल्या शेतात शेततळे तयार करण्याचा निश्चय केला. ३० बाय ३० आकाराची ३ मीटर खोलीची ८ शेततळी, ३० बाय २५ आकाराची ६ शेततळी, २५ बाय २५ आकाराची ३ आणि ४५ बाय २० आकाराची ३ शेततळी अशी एकूण २३ शेततळी खोसेटोल्यातील २३ शेतकऱ्यांच्या शेतात जलयुक्त शिवार अभियानातून तयार करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात धानाची रोपे गर्भावस्थेत व ओंबीच्या अवस्थेत असताना २५० मि.मी. पावसाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात २२२ मि.मी. तर आॅक्टोबर महिन्यात २०० मि.मी. पावसाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ९६ मि.मी. पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना धानपिकाच्या उत्पन्नात घट व्हायची. परंतु निसर्गाने सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये दगा दिला तरी शेततळीतून संरक्षित सिंचनाच्या आधारावर शेतकऱ्यांनी चांगले धानाचे उत्पादन घेतले. शेततळी असलेल्या शेतकऱ्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांना शेततळ्यातून पाणी दिल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ झाली. खोसेटोल्याचे शेतकरी खेमचंद बिसेन म्हणाले, घरी असलेल्या साडेचार एकर शेतीतील धानाची रोवणी शेततळतील पाण्यामुळे झाली. शेजारच्या रूपचंद पारधी या शेतकऱ्याला रोवणीसाठी पाणी दिले. पुढे या तळ्यातील पाण्यातून मत्स्यशेती सोबतच हरबरा, जवस पीक घेणार असल्याचे सांगितले. शेततळ्यामुळे शेतकरी सुखावले. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांनी निभावला शेजारधर्म या २३ शेततळ्यांतून ४०.२६ टीसीएम पाण्याची उपलब्धता झाली. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या ८० हेक्टर शेतीला संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली. जलयुक्त शिवार अभियानातून खोसेटोल्यातील २३ शेतकऱ्यांच्या शेतात शेततळी तयार करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक शेततळी असलेले गाव म्हणून खोसेटोल्याची ओळख झाली. शेततळे असलेल्या शेतकऱ्यांनी शेजारधर्म म्हणून बाजूच्या शेतकऱ्यांनासुध्दा भाताचे पऱ्हे लागवडीकरिता शेततळ्यातून पाणी दिले. खोसेटोल्याच्या अर्थकारणात दुग्धव्यवसाय गोरेगाव तालुक्यातील १६३ कुटुंबाचे ८०९ लोकवस्ती असलेले खोसेटोला हे गाव. इथल्या ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. बहुतांश धान उत्पादक शेतकरी असलेल्या या गावात शेतीपुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाच्या कामात बहुतांश शेतकऱ्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. व्यसनासाठी गावात एकही पानटपरी नाही. ग्रामस्थांनी स्वत:ला शेती व दूध व्यवसायात व्यस्त करून घेतले आहे. गावातील ६८ शेतकऱ्यांना चार वर्षापूर्वी कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कोरडवाहू शाश्वत शेती कार्यक्रमातून ८८ जर्सी व होस्टन जातीच्या दुधाळ गायींचे वाटप केले. या गायींपासून एक हजार ३५० लिटर दुधाचे संकलन दररोज करण्यात येते. त्यामुळे खोसेटोल्यातील अर्थकारणात दुग्धव्यवसायाचा महत्वाचा वाटा आहे.