७९ केंद्र होताहेत सज्ज

By Admin | Updated: October 23, 2016 01:44 IST2016-10-23T01:44:37+5:302016-10-23T01:44:37+5:30

वर्षभरातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीत घरात ‘लक्ष्मी’ यावी यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

79 Centers are ready for the center | ७९ केंद्र होताहेत सज्ज

७९ केंद्र होताहेत सज्ज

धान खरेदीचा मुहूर्त निघाला : उद्यापासून होणार जिल्हाभरात सुरूवात
गोंदिया/देवरी : वर्षभरातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीत घरात ‘लक्ष्मी’ यावी यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांकडून कमी भावात धान खरेदी सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांकडून लुबाडणूक होऊ नये म्हणून लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत असताना जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून (दि.२४) धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात एकूण ७९ केंद्रांवर यावर्षी शासनाच्या आधारभूत किमतीनुसार धान खरेदी होणार आहे. त्यापैकी ५६ केंद्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे तर २३ केंद्र आदिवासी विकास महामंडळाचे आहेत. सर्वच्या सर्व केंद्र सोमवारी सुरू करणे शक्य नाहीत. त्यासाठी संबंधित सहकारी संस्थांसोबत करारनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून तीन दिवसात सर्व केंद्र सुरळीतपणे कार्यान्वित होतील, असा विश्वास दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
देवरीच्या महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाकडून देवरी तालुक्यात ८ आणि सालेकसा तालुक्यात ५ असे एकूण १३ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. याशिवाय सडक अर्जुनी व अर्जुनी तालुक्यातील १० केंद्र राहणार आहेत.
या संबधात आ.संजय पुराम आणि आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग यांनी पुढाकार घेऊन दिवाळीपूर्वी सदर धान खरेदी केंद्रांना मंजूर करण्याकरिता प्रयत्न केले. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी धान खरेदीची मागणी केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 79 Centers are ready for the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.