७५ कामगार व कुटुंबियांनी घेतला शिबिराचा लाभ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:21+5:302021-09-11T04:29:21+5:30

गोंदिया : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कल्याण केंद्रात कामगार व कामगारांच्या कुटुंबीयांकरिता बुधवारी (दि. ८) नेत्ररोग निदान ...

75 workers and families took advantage of the camp () | ७५ कामगार व कुटुंबियांनी घेतला शिबिराचा लाभ ()

७५ कामगार व कुटुंबियांनी घेतला शिबिराचा लाभ ()

गोंदिया : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कल्याण केंद्रात कामगार व

कामगारांच्या कुटुंबीयांकरिता बुधवारी (दि. ८) नेत्ररोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ७५ कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला.

अध्यक्षस्थानी नागपूर विभागाचे सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड होते. यावेळी शासकीय

वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. सुप्रिया सुटे, डॉ. गजानन कोंडावार, डॉ. आकाश मोटवानी, डॉ. सुभम टेंभरे, कामगार

कल्याण अधिकारी कांचन वाणी व नागरी सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव सुनील पारधी उपस्थित

होते. याप्रसंगी राठोड यांनी, जागतिक युनिसेफ ऑर्गनायझेशन व कामगार कल्याण मंडळाच्या संयुक्त वतीने कोविड-१९ काळात रोजगार गमावलेल्या कामगार व कामगारांच्या कुटुंबीयांना विविध उद्योगाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असे जाहीर केले. संचालन कामगार कल्याण केंद्राचे संचालक ताम्रदिप जांभूळकर यांनी केले. आभार छाया मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी शुभम कांबळे, प्रकाश मेश्राम, ताराचंद नागरीकर, जावेद शेख, तृप्ती जांभूळकर, अजयसिंह चंदेल व कोमल बडवाईक यांनी सहकार्य केले.

Web Title: 75 workers and families took advantage of the camp ()