दर्भेंच्या खात्यात ७.३४ लाख रोख
By Admin | Updated: March 1, 2015 01:06 IST2015-03-01T01:06:55+5:302015-03-01T01:06:55+5:30
नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात मिळून आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता सुनिल वासुदेवराव दर्भे (५२) यांच्या नागपूर...

दर्भेंच्या खात्यात ७.३४ लाख रोख
गोंदिया : नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात मिळून आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता सुनिल वासुदेवराव दर्भे (५२) यांच्या नागपूर येथील घराची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली. यात विभागाला त्यांच्या बँक खात्यात रोख सात लाख ३४ हजार १३९ रूपये तसेच घर, चारचाकी- दुचाकी वाहन व दागिनेही आढळले.
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दर्भे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. त्यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१३(१)(ड) सहकलम १३(२) अंतर्गत गुन्हा नोंद आहे. दरम्यान विभागाच्या पथकाने त्यांच्या नागपूर येथील पोस्टल कॉलनी, प्रतापनगरस्थित घरात पाच लाख रूपये किंमतीचे घर, दोन लाख रूपये किंमतीची कार, ९० हजार २३७ रूपये किंमतीच्या दोन दुचाकी, विजया बँकेच्या पासबुक मध्ये सात लाख ३४ हजार १३९ रूपये, लॉकरमध्ये १२६.८६० गॅ्रम वजनाचे सोन्याचे तर ४९.८६० गॅ्रम वजनाचे चांदीचे दागिने मिळून आले.