शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

कवडी न देता बांधणार ६८ हजार शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 21:41 IST

जिल्हा निर्मल करण्याच्या नादात काही शौचालय कागदावर तर काही शौचालय निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आले होते. तरीही देखील गोंदिया जिल्हा पाच-सात वर्षापूर्वीच हागणदारीमुक्त (ओडीएफ) झाला होता.

ठळक मुद्देघडेल वर्तणुकीत बदल : सीईओ रविंद्र ठाकरे यांचा नाविण्यपूर्ण प्रयोग

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा निर्मल करण्याच्या नादात काही शौचालय कागदावर तर काही शौचालय निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आले होते. तरीही देखील गोंदिया जिल्हा पाच-सात वर्षापूर्वीच हागणदारीमुक्त (ओडीएफ) झाला होता. परंतु ६७ हजार ७८३ कुटुंबाकडे शौचालय नाहीत किंवा ज्यांच्याकडे आहेत ते वापरायोग्य नाही. त्यामुळे हागणदारीमुक्त असलेल्या जिल्ह्यात उघड्यावर शौच करण्याचा उपक्रम सुरूच होता. परंतु गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी शौचालयासंदर्भात जागृती घडवून शासकीय मदत न देता त्या कुटुंबाना शौचालय बांधण्यासाठी जागृत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची फलश्रृती अशी की जिल्ह्यातील उघड्यावर शौचास जाणाºया ९ हजार ९४७ कुटुंबाकडे शौचालय तयार झाले आहे.गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तर पूर्वेस मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पायाभूत सर्व्हेक्षणानुसार २ लाख १७ हजार १५३ कुटुंब एवढी आहे. यापैकी १ लाख २८ हजार ३६७ कुटुंबाकडे शौचालय वापरात आहेत. तर ८८ हजार ७८६ कुटुंबाकडे शौचालय नसल्याची नोंद घेण्यात आली होती. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व इतर योजनांच्या माध्यमातून आजतागायत ६६ हजार ५५४ वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. उर्वरित २२ हजार २३२ कुटुंब हे इतरांच्या शौचालयाचा (शेअरिंग) वापर करीत असल्याची नोंद घेण्यात आलीे. याशिवाय जिल्ह्यात एकूण ४५ हजार ५५१ वापरण्यायोग्य नसलेली/ नादुरुस्त शौचालयांची नोंद घेण्यात आली आहे.नादुरुस्त व शेअरिंग असे एकूण ६७ हजार ७८३ शौचालयाचे बांधकाम व वापर करण्याचे उद्दिष्ट ३१ डिसेंबर २०१७ अखेर पर्यंत कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे, यांनी केले आहे. यासाठी त्यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड सहकार्य करीत आहेत. शौचालयासंदर्भात जागृती करण्यासाठी गृहभेट घेऊन आंतर वैयक्तीक संवाद साधला जात आहे.यासाठी जिल्हा व तालुका कर्मचाºयांची बैठक घेण्यात आली. नादुरुस्त शौचालय बांधकामाबाबत येणाºया अडचणींचा आढावा घेण्यात आला. त्यावर उपाययोजना व कुटुंबांतर्गत घेण्यात येणाºया गृहभेटीची माहिती देण्यात आली. या शौचालय बांधकामासाठी केंद्र शासनाच्या नेहरु युवा केंद्रातील १६ स्वयंसेवकांना सुद्धा गृहभेटीसाठी ग्रामपंचायती नेमून देण्यात आल्या. नेहरु युवा केंद्रातील स्वयंसेवकांनी तयार केलेले युवक मंडळ उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांची सुद्धा मदत घेत आहेत.सरकारचा घुमजावसुरूवातीला १२०० रूपये किंवा ५०० रूपये अनुदान घेऊन तयार ककरण्यात आलेले शौचालय आजघडीला बंद अवस्थेत आहेत. त्या शौचालयामुळे गोंदिया जिल्हा कागदावर ओडीएफ वाटत होता. ६७ हजार कुटुंबे उघड्यावर शौचास जात असताना याकडे राज्यशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबाचे शौचालय महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेतून बांधण्याचे आदेश दिले होते. परंतु केंद्र शासनाने या प्रस्तावाला मान्यता न दिल्यामुळे पुन्हा राज्य सरकारने घुमजाव केला. परिणामी तोडगा म्हणून आता जनजागृतीतून हे शौचालय बांधले जात आहेत.गृहभेटीची त्रिस्तरीय योजनागृहभेट हे साध्य नाही, ते साधन आहे. म् हे साधन वारंवार वापरले गेले पाहिजे. गृहभेट हा सातत्याने करण्यात येणारा प्रयोग आहे. केवळ एक गृहभेट करुन चालत नाही तर वर्तणुकीत बदल हवा, असे वारंवार लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी गृहभेटीत सातत्य ठेवून एकाच घरी किमान तीन वेगवेगळ्या स्तरावर गृहभेट करण्याचे नियोजन केले आहे.जिल्हास्तरावरील जि.प.च्या १७ विभाग प्रमुखांना तालुकास्तरावर पालक अधिकारी नेमण्यात आले. त्या सर्वांनाच एक ग्रामपंचायत विशेष कार्यासाठी दत्तक देण्यात आली. या अधिकाºयांच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर गृहभेटी देत आहेत. तालुकास्तरावरील वर्ग १ ते ३ च्या अधिकाºयांना ग्रामपंचायतस्तरावर नोडल अधिकारी नेमण्यात आले. गावस्तरावरील नादुरुस्त शौचालयांचा वापर, शालेय व अंगणवाडी येथे शौचालयांचा वापर, गावात समग्र स्वच्छता, गुडमार्निंग पथक राबवून लोकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावर ४६० अधिकारी/कर्मचारी नेमले आले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) अंतर्गत गटसंसाधन केंद्रातील २४ गट/समूह समन्वयक, नेहरू युवा केंद्रातील १६ स्वयंसेवकांना ग्रामपंचायतीची विभागणी करुन देण्यात आली. दररोज प्रत्येक घरी किमान अर्धातास वेळ देवून एका दिवसांत जास्तीत जास्त १७ ते २० गृहभेटीचे लक्ष्य या गटाकडे सोपविण्यात आले.९९४७ कुटुंबांनी बांधले शौचालय‘खुले मे शौच से आझादी’ हे ब्रिद घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमातून जबरदस्त जनजागृती करण्यात आल्याने गोंदिया जिल्ह्यातील ९ हजार ९४७ लोकांनी आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याच्या काळात शौचालयाचा वापर सुरू केला. ज्यांच्याकडे शौचालय नाही किंवा ज्यांच्याकडे शौचालय आहे,परंतु ते वापरात नसल्यामुळे त्यांना दुरूस्त करून वापर सुरू केले आहे. उघड्यावर शौचास जाणार नाही असा चंग या कुटुंबानी बांधला आहे.जिल्हा ओडीएफ असूनही अनेक कुटुंब उघड्यावर शौचास जात होते. उघड्यावर शौचास गेल्यास होणारे आजार व समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे हे त्या कुटुंबाना पटवून दिले जात असल्यामुळे त्या लोकांनी पुढाकार घेऊन शौचालय बांधले आहेत. ३१ डिसेंबर पर्यंत प्रत्येकाने शौचालयाचाच वापर करावा यासाठी संपूर्ण शौचालय बांधकामाचे उद्दीट्ये ठेवण्यात आले आहे.-रविंद्र ठाकरेमुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. गोंदिया.