शेअर मार्केट ट्रेडिंग करतांना ६८ लाखाची फसवणूक

By नरेश रहिले | Updated: February 27, 2024 20:40 IST2024-02-27T20:40:02+5:302024-02-27T20:40:18+5:30

एम.ब्लॅक रॉक नावाचा बनविला होता व्हॉट्सॲप ग्रूप: ग्रूपच्या पाच मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल

68 lakh fraud while doing share market trading | शेअर मार्केट ट्रेडिंग करतांना ६८ लाखाची फसवणूक

शेअर मार्केट ट्रेडिंग करतांना ६८ लाखाची फसवणूक

नरेश रहिले, गोंदिया: शेअर मार्केट ट्रेडींंग करण्याची जणू शर्यतच लागली आहे. जो-तो शेअर मार्केट ट्रेडींंग करून मोठे पैसे कमविण्याची लालसा करतो. शेअर मार्केट ट्रेडींंग करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रूप तयार करून ६८ लाखाची फसवणूक करणाऱ्या त्या ग्रूपच्या पाच मोबाईल धारकांवर गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गोंदियाच्या मरारटोली, बालाघाट रोड भगतसिंग वॉर्ड गोंदिया येथील मोहम्मद रझा मनैुद्दीन तिघाला (२९) यांना २० नोव्हेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३ या दरम्यान शेअर मार्केटचे बनावटी ॲप तयार करून शेअरमार्केटमध्ये पैसे कसे गुंतवणूक करून पैसे कसे खेळायचे याची माहितीही ते व्हॉट्सॲप ग्रूपवर द्यायचे. त्यांच्या आमिषाला बळी पडून मोहम्मद रझा मनैुद्दीन तिघाला (२९) यांची तब्बल ६८ लाख १३ हजार २६७ रूपयाने फसवणूक केली आहे. मोहम्मद तिघाला १२ नोव्हेंबर २०२३ रोजी फेसबूक व इन्स्टाग्रामचा वापर करीत असतांना इन्स्टाग्रामवर त्यांना एक लिंक दिसली. शेअर मार्केट संदर्भात माहिती देणारी ती लिंक होती. त्या लिंकला उघडल्यावर एम ब्लॉक रॉक या व्हॉट्सॲप ग्रूपचा सदस्य बनविले. त्या ग्रूपमध्ये ८७ लोक होते. त्यापैकी ११ लोक ॲडमीन होते. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी ॲडमीन पैकी एकाने त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर चॅटींग करून ट्रेडींग संदर्भात मािहती देऊन आपल्या मोबाईलने एक लिंक पाठविली होती. त्या लिंकला उघडल्यावर व्हीआयपी कॅन्सुलेशन या नावाच्या व्हॉटसॲप ग्रूपवर जोडण्यात आले. आरोपी सांगत गेले आणि मोहम्मद तिघाला प्रोसेस करीत गेले. आणि तब्बल ६८ लाखाने त्यांची फसवणूक करण्यात आली.

१० ते २० टक्के रक्कम अधिक मिळण्याचे दिले आमिष

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यावर गुंतवलेल्या पैश्याचे १० ते २० टक्के रूपये तुम्हाला मिळतील असे आमिष देऊन मोहम्मद रझा मनैुद्दीन तिघाला (२९) यांची फसवणूक करण्यात आली.

१२ ट्रान्जेक्शनमधून लुटले ६८ लाख

वेगवेगळ्या वेळी १२ ट्रान्जेक्शन करून मोहम्मद रझा मनैुद्दीन तिघाला (२९) यांनी आरोपींना ६८ लाख १३ हजार २६७ रूपये पाठविले. त्यातील ३८ लाख एक हजार १०१ रूपये बॅंक ऑफ इंडिया, ४ लाख रूपये तिघाला ट्रडर्सच्या ॲक्सीस बॅंकेतून तर २६ लाख ४९ हजार ९६६ रूपये आयसीआयसीआय बॅंकेच्या खात्यातून आरोपींना पाठविण्यात आली होती.

Web Title: 68 lakh fraud while doing share market trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.