६७ तासांपासून १० गावे अंधारात

By Admin | Updated: June 25, 2015 00:48 IST2015-06-25T00:48:40+5:302015-06-25T00:48:40+5:30

उपविभाग तिरोडा अंतर्गत तिरोडा आणि गंगाझरी शाखेच्या अधिकार क्षेत्राखाली येणाऱ्या आठ ते दहा गावात १६ ते १९ जून या चार दिवसात ६७ तास विद्ुत पुरवठा खंडीत राहिला.

From the 67 hours to 10 villages in the dark | ६७ तासांपासून १० गावे अंधारात

६७ तासांपासून १० गावे अंधारात

अधिकारी उदासीन : झाडांच्या फांद्या येतात मधात
काचेवानी : उपविभाग तिरोडा अंतर्गत तिरोडा आणि गंगाझरी शाखेच्या अधिकार क्षेत्राखाली येणाऱ्या आठ ते दहा गावात १६ ते १९ जून या चार दिवसात ६७ तास विद्ुत पुरवठा खंडीत राहिला. सायंकाळी ७ वाजतापासून सतत तीन दिवस नागरिकांना अंधारात राहावे लागले.
पावसाळ्याचे दिवस आले की, माणूस व प्राण्यांना जपून राहावे लागते. अशावेळी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि विद्युत विभाग नागरिकांना योग्य सोई व सुविधा देण्यासाठी काळजी घ्यायची असते. मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
मंगळवार (दि. १६) ला सायंकाळी ६.३० दरम्यान वादळासह पाऊस सुरु होताच विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ११ वाजता विद्युत सुरु केल्यानंतर लगेच पुन्हा बंद करण्यात आला. सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास सतत दोन दिवस संपूर्ण रात्र आणि दिवस विद्युत पुरवठा बंद होता. (दि.१९) ला सायंकाळी ७.१५ दरम्यान विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला.
सतत तीन दिवस व रात्र अंधारात राहणारी गावे बरबसपुरा, धामनेवाडा, निमगाव, इंदोरा, मेहंदिपूर, भिवापूर व अन्य चार गावांचा समावेश आहे. यापैकी तीन गावे जंगल परिसरात असल्याने भर पावसाळ्यात विजेची समस्या नेहमीची आहे. पावसाळा सुरु झाला असून वीज खंडीत होण्याची समस्या सर्व नागरिकांकरीता चिंतेची बाब बनली आहे.
रात्रीच्या वेळी सात दाने असणारा किडा, विंचू, साप आदी विषारी जातीचे किडे दिसून येतात. या व्यतिरिक्त शेकडो जाती, प्रजातीचे किडे दिसून चावण्याची भिती असते. पावसाळ्याच्या दिवसात विद्युत पुरवठा नियमित असायला पाहिजे. परंतु दहा गावातील नागरिकांना ६७ तासापासून अंधारात आहेत. (वार्ताहर)

फांद्या कापल्यास अडचण दूर
अंधारात असलेली ही गावे जंगल परिसरात असल्याने या गावांना विजेचा पुरवठा जंगलातून आणि शेतशिवारातून होत असते. विजेच्या तारावर तसेच आजूबाजूच्या झाडांच्या फांद्यांचा वाहिन्यांना स्पर्श होत असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होतोे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी वीज पुरवठा होणाऱ्या वाहीन्यांचा मार्ग सुरळीत करणे गजरेचे होते. मात्र, याकडे वीज अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. वीज कनेक्शन आणि वीज चोरी पकडण्याच्या नावे लाखो रुपयाची अवैध कमाई केल्याने पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केले आहे. अशीच परिस्थिती २०१२ आणि २०१३ या दोन वर्षात धामनेवाडा आणि बरबसपुरा या दोन वर्षात होती. एकूण दिवसाच्या निम्मे दिवस चांगल्या प्रकारे ग्राहकांला विजेचा वापर करता आला नाही. अशीच स्थिती यावर्षीसुद्धा दिसून येत आहे.

Web Title: From the 67 hours to 10 villages in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.