६५० दात्यांचा रक्क्तदानाचा विक्रम
By Admin | Updated: February 15, 2015 01:23 IST2015-02-15T01:23:43+5:302015-02-15T01:23:43+5:30
प्रेम व बलीदान दिवस म्हणून ओळखल्या जाणारा १४ फेब्रुवारी व्हॅलेंडाईन डे म्हणूनच संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो.

६५० दात्यांचा रक्क्तदानाचा विक्रम
देवरी : प्रेम व बलीदान दिवस म्हणून ओळखल्या जाणारा १४ फेब्रुवारी व्हॅलेंडाईन डे म्हणूनच संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. परंतु याच दिवशी भारतमातेचे रक्षण करताना शहिद झालेले भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. देशासाढी बलिदान देणाऱ्या हुताम्यांच्या स्मृतीत शनिवारी १४ फेब्रुवारीला देवरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
शहीदांनी बलीदान दिले, आपण रक्तदान करूया अशा भावनात्मक हाकेला प्रतिसाद देत ६५० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून नविन विक्रम नोंदविला.
या शिबीरात देवरी उपविभाग अंतर्गत असणारे सर्व आऊट पोस्टचे नक्कल कमांडो तसेच पोलीस कर्मचारी, अधिकारी, कॉलेजचे तरूण-तरुणींनी व शहरातील महिला पुरुषांनी रक्तदान करून देशसेवेला हातभार लावला.
या शिबीरात आरोग्य विभागाच्या गोंदिया व भंडारा येथील शासकीय रक्तपेढी येऊन रक्त संकलित केले. इतक्या मोठ्या प्रमाणात ६५० लोकांनी एकाच वेळी रक्तदान करून विदर्भात नवीन विक्रम केल्याचे आरोग्य अधिकारी म्हणाले, भारत मातेच्या रक्षणाकरिता ज्यांनी बलीदान दिले त्यांच्या स्मृतीत रक्तदान करून देशसेवा करण्याकरिता सर्वानी रक्तदात्यांनी सकाळी ८ वाजतापासूनच पोलीस प्रांगणात एकच गर्दी केली होती.
पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांच्या या स्तुत्य उपक्रमांची सर्वानी प्रशंसा केली. त्यांच्या या उपक्रमांची दखल घेत क्षेत्राचे आमदार संजय पुराम व सविता पुराम यांनी त्यांचा याप्रसंगी सत्कार केला.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधिकारी नक्षल सेलचे कमांडो, ग्रामीण रुग्णालय यशस्वीतेसाठी पोलीस अधिकारी नक्षल सेलचे कमांडो, ग्रामीण रुग्णालय व सर्व प्राथमिक स्वास्थ केंद्र तसेच गोंदिया व भंडाराच्या रक्तसंकलन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. (प्रतिनिधी)