लोकसभेनंतर ६२ हजार १५५ मतदारांची भर

By Admin | Updated: September 29, 2014 23:07 IST2014-09-29T23:07:24+5:302014-09-29T23:07:24+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघांमध्ये ६२ हजार १५५ मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या आता १० लाख २२ हजार ७१५ झाली आहे.

62 thousand 155 voters after the Lok Sabha | लोकसभेनंतर ६२ हजार १५५ मतदारांची भर

लोकसभेनंतर ६२ हजार १५५ मतदारांची भर

गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघांमध्ये ६२ हजार १५५ मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या आता १० लाख २२ हजार ७१५ झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेल्या या मतदारांमध्ये सर्वाधिक वाढ गोंदिया मतदार संघात तर सर्वात कमी अर्जुनी मोरगाव मतदार संघात झाली आहे.
वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले युवक-युवती मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, याकरिता ८ जून ते ३० जूनदरम्यान प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात ५८ हजार ८ मतदारांची नव्याने नोंद झाली. त्यानंतर १ आॅगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीतही मतदारांची नोंदणी करून त्यांचे नाव विधानसभा निवडणुकीच्या यादीत टाकण्यात आले. यादरम्यान ४१४७ मतदारांची नव्याने नोंदणी झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के. लोणकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात अर्जुनी/मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव अशी एकूण चार विधानसभा क्षेत्रे आहेत. अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात अर्जुनीसह सडक/अर्जुनी व गोरेगाव तालुका येतो. तिरोडा क्षेत्रात तिरोडासह गोंदिया व गोरेगाव तालुक्याच्या काही भाग येतो. गोंदिया क्षेत्रात फक्त गोंदिया तालुका तर आमगाव क्षेत्रात देवरी, सालेकसा व आमगाव तालुक्यांचा अंतर्भाव होतो. आता नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांच्या यादीनुसार अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात २ लाख ३८ हजार ७९०, तिरोडा क्षेत्रात २ लाख ३९ हजार ३३६, गोंदिया क्षेत्रात २ लाख ९३ हजार ४४७ तर आमगाव क्षेत्रात २ लाख ५१ हजार १४२ मतदार झाले आहेत. जिल्ह्यात एकूण १ हजार २३० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात ३०५, तिरोडा क्षेत्रात २८८, गोंदिया क्षेत्रात ३३४ तर आमगाव क्षेत्रात ३०२ मतदान केंद्रातून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान केंद्रातील व्यवस्था पार पाडण्यासाठी अर्जुनी/मोरगाव येथे ३०५, तिरोडा २८८, गोंदिया ३३५ तर आमगाव क्षेत्रात ३०२ असे एकूण १२३० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सेना दलातील तब्बल १ हजार ६८३ मतदारही मतदानांचा हक्क पार पाडणार आहेत. अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात पुरूष २०३, स्त्रिया ७४ असे एकूण २७७ सेना दलातील मतदार आहेत. तिरोडा क्षेत्रांतर्गत पुरुष २८७, स्त्रिया १५३ असे एकूण ६४०, गोंदिया क्षेत्रात पुरूष ३५६, स्त्रिया १०१ असे एकूण ४५७ तर आमगाव क्षेत्रात पुरूष २५१, स्त्रिया ५८ एकूण ३०९ असे एकूण १ हजार ६८३ सेना दलातील मतदार मतदान करणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 62 thousand 155 voters after the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.