शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
3
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
4
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
5
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
6
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
7
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
8
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
9
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
10
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
11
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
12
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
13
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
14
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
15
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
16
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
17
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
18
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
19
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
20
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण

६२ कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 5:00 AM

सोमवारी (दि.१०) तिरोडा तालुक्यातील पाटीलटोला येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा चवथा बळी गेला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून दररोज सरासरी ५० नवीन रुग्णांची भर पडत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने संसर्ग वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकोरोना बाधितांच्या संख्येत आणखी ३९ रुग्णांची भर : दहा दिवसात तिनशे रुग्णांची भर, कोरोनाचा वाढतोय संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. १० ऑगस्टपर्यंत ३६१ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. मंगळवारी (दि.११) यात पुन्हा ३९ कोरोना बाधितांची भर पडल्याने हा आकडा ४०० वर पोहचला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली. मात्र मंगळवारी ६२ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात मंगळवारी आढळलेल्या ३९ कोरोना बाधितांमध्ये गोंदिया शहरातील १० रुग्णांचा समावेश आहे. यात शास्त्री वार्ड ३, कुंभारटोली २, सिंधी कॉलनी २, कामठा बुध्दाटोला १, आंभोरा रावणवाडी २ तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील ८, तिरोडा तालुक्यातील ८ रुग्ण असून यात बेलाटी ७, वडेगाव १, आमगाव तालुक्यातील ८ रुग्ण असून यामध्ये आमगाव शहर ४, पद्मपूर २, रिसामा १, बनगाव १, देवरी शहरातील ४ आणि गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथील एका रुणाचा समावेश आहे. गोंदिया, आमगाव आणि तिरोडा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने हे तिन्ही तालुके आता कोरोनाचा हॉटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे.सोमवारी (दि.१०) तिरोडा तालुक्यातील पाटीलटोला येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा चवथा बळी गेला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून दररोज सरासरी ५० नवीन रुग्णांची भर पडत आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने संसर्ग वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता गावकऱ्यांनीच कंबर कसल्याचे चित्र आहे.आमगाव येथे जनता कर्फ्यूआमगाव आणि सालेकसा तालुक्यातील मागील दोन दिवसात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी शहरवासीय आणि व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारपासून (दि.१२) आमगाव येथे सात दिवस तर सालेकसा येथे सहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या कालावधीत या दोन्ही शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे.आतापर्यंत ३९४ कोरोना बाधितांची कोरोनावर मातजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चिंतेचे वातावरण आहे. मात्र कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ११ हजार ५५६ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६८३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर १० हजार ६०७ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर २०५ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे. १७९ नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. तर ३९४ कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.उपाययोजना राबविण्यात प्रशासन अपयशीजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. क्वारंटाईन सेंटर आणि कोविड केअर सेंटरमधील अनागोंदी कारभाराच्या दररोज तक्रारी पुढे येत आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये योग्य सोयी सुविधा दिल्या जात नसल्याने अनेकजण बाहेरुन आल्यानंतर प्रशासनाला माहिती न देता थेट घरी जात आहेत. यातूनच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.नागरिकांनो वेळीच व्हा सावधमागील आठ दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, नियमित मास्कचा वापर करा,दिवसभरातून वांरवार हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच आपल्यासमोरील व्यक्ती ही कोरोना बाधित आहे असे समजून स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या