जिल्हा परिषदेच्या ६ शाळांना मिळणार जीम साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:30 IST2021-07-30T04:30:59+5:302021-07-30T04:30:59+5:30

गोंदिया : जिल्हा नियोजन समितीच्या मंजुरीने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ६ जिल्हा परिषद शाळांना जीम साहित्य दिले जाणार आहे. आमदार ...

6 Zilla Parishad schools will get gym equipment | जिल्हा परिषदेच्या ६ शाळांना मिळणार जीम साहित्य

जिल्हा परिषदेच्या ६ शाळांना मिळणार जीम साहित्य

गोंदिया : जिल्हा नियोजन समितीच्या मंजुरीने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ६ जिल्हा परिषद शाळांना जीम साहित्य दिले जाणार आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या पाठपुराव्याने आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी जीम उपलब्ध होणार आहे.

शिक्षणासोबतच आपले शरीर स्वस्थ ठेवणे गरजेचे असून यातूनही विद्यार्थी आपला विकास साधू शकतात. मात्र सध्या शाळांमध्ये सध्या व्यायामासाठी जीम नसल्याने विद्यार्थ्यांना यापासून दूर रहावे लागत आहे. हीच बाब हेरून आमदार अग्रवाल यांनी, जिल्हा नियोजन समितीमधून शाळांमध्ये जीम साहित्यांसाठी प्रस्ताव मांडला होता. त्याला मंजुरी मिळाली असून प्राथमिक तत्वावर विधानसभा क्षेत्रातील कुडवा, रत्नारा, हिवरा, छिपिया, बनाथर व तेढवा येथील जिल्हा परिषद शाळांना प्रत्येकी सहा लाख रूपये किंमतीचे जीम साहित्य दिले जाणार आहे. लवकरच या साहित्यांचे वितरण केले जाणार आहे. इतरही गावांतील शाळांमध्ये हे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२१-२२ च्या आर्थिक नियोजनात प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी कळविले आहे.

Web Title: 6 Zilla Parishad schools will get gym equipment