५२८ लाभार्थ्यांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST2021-09-02T05:01:36+5:302021-09-02T05:01:36+5:30

सडक-अर्जुनी : तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व पंचायत समिती यांच्या संयुक्तवतीने रविवारी (दि.२९) तालुक्यातील ग्राम जांभळी येथे ...

528 beneficiaries took advantage of government schemes () | ५२८ लाभार्थ्यांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ ()

५२८ लाभार्थ्यांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ ()

सडक-अर्जुनी : तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व पंचायत समिती यांच्या संयुक्तवतीने रविवारी (दि.२९) तालुक्यातील ग्राम जांभळी येथे नालसा- २०१५ आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण आणि अंमलबजावणी योजना आदिवासी समाज व इतर ग्रामस्थांसाठी विविध शासकीय योजनांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ५२८ लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ व माहिती घेतली.

अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एन. आर. वानखेडे, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) विक्रम आव्हाड, तहसीलदार उषा चौधरी, खंडविकास अधिकारी एम.एस. खुणे, ठाणेदार एस. जी. वांगडे, ए.एस. देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर.के. लंजे, सचिव ॲड. डी. एस. बन्सोड, तालुका वैद्यकीय अधिकारी एच. यु. मेश्राम, महिला व बाल प्रकल्प अधिकारी पी.टी. मेंढे उपस्थित होते. मेळाव्यात एकूण १९ विविध शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदविला. तर सुमारे ५२८ लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ व माहिती घेतली. याप्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे आव्हाड यांनी, ज्या पात्र लाभार्थ्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना योजनांचा पुरेपूर लाभ मिळण्यासाठी तालुका विधी सेवा समिती सातत्याने पाठपुरावा करेल व त्यांच्यापर्यंत योजना पोहोचविल्या जातील, अशी ग्वाही दिली. संचालन ॲड. गहाणे यांनी केले. आभार ॲड. रंगारी यांनी मानले. मेळाव्यासाठी वकील संघ तसेच जांभळीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

--------------------------------------

लाभार्थ्यांना साहित्य, धनादेश व प्रमाणपत्रांचे वाटप

या मेळाव्यात न्या. औटी यांच्या हस्ते ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेतील ५ पात्र लाभार्थ्यांना सुरक्षाठेव प्रमाणपत्र, ४ लाभार्थ्यांना 'बेबी केअर किट', समाजकल्याण विभागातर्फे एका दिव्यांग लाभार्थ्याला झेरॉक्स मशीनसाठी ५० हजारांचा धनादेश, ५ पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड, ९ पात्र लाभार्थ्यांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे पत्र, ६ पात्र लाभार्थ्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाईचे धनादेश तसेच ३ विद्यार्थ्यांना गणवेश व २ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

Web Title: 528 beneficiaries took advantage of government schemes ()