शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

युपी व एमपीचा ५० हजार क्वींटल धान तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST

सालेकसा तालुका हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असून सीमेलगत अनेक गावांमध्ये धान व्यापारी आपले बस्तान मांडून बसले आहेत. काही व्यापाऱ्यांनी आपल्या घरा लगत किंवा दुकानालगत धान संग्रहीत करुन ठेवण्यासाठी गोडाऊन सुद्धा तयार करुन ठेवले आहेत. धानाचे पीक निघताच हे व्यापारी शेतकऱ्यांकडील धान खरेदी करुन घेतात. काही व्यापारी तर पीक  निघण्यापूर्वीच काही शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देवून ठेवतात.

ठळक मुद्देयुपीचा शेकडो ट्रक धान उतरला : व्यापाऱ्यांचे सातबारा संकलन अभियान

 विजय मानकर    लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा  :  मागील २ वर्षांपासून सालेकसा तालुक्यात धान खरेदीबाबत गैरव्यवहार होताना उघड झाले असता त्या गैरव्यवहारावर सतत अंथरुन पांघरुन टाकण्याचे काम खरेदी करणाऱ्या सदस्यांनी केले. एवढेच नाही तर रद्द झालेला परवाना पुन्हा बहाल करण्यात यशस्वी होवून पुन्हा धान खरेदी सुरु झाली. परंतु यंदा या तालुक्यात व्यापाऱ्यांनी लाखो व करोडो रुपये कमविण्याचा नवीन फंडा सुरु केला असून गावागावांतील अनेक व्यापाऱ्यांनी जवळपास ५० हजार क्विंटल धान युपी आणि एमपी राज्यातून बोलावला आहे. तो धान येथील धान खरेदी केंद्रावर विक्री करण्याचे दावपेच खेळू लागले आहेत. यासाठी गावातील शेतकऱ्यांचे सातबारा संकलन करण्याची मोहीम चालविली आहे. यामुळे तालुक्यातील खरा धान विक्री करणारा शेतकरी आपला धान विक्री करण्यापासून वंचित राहू शकतो.सालेकसा तालुका हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असून सीमेलगत अनेक गावांमध्ये धान व्यापारी आपले बस्तान मांडून बसले आहेत. काही व्यापाऱ्यांनी आपल्या घरा लगत किंवा दुकानालगत धान संग्रहीत करुन ठेवण्यासाठी गोडाऊन सुद्धा तयार करुन ठेवले आहेत. धानाचे पीक निघताच हे व्यापारी शेतकऱ्यांकडील धान खरेदी करुन घेतात. काही व्यापारी तर पीक  निघण्यापूर्वीच काही शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देवून ठेवतात. धानाची मळनी होताच शेतकऱ्यांच्या खड्यावरुनच त्याच्या धानाची उचल करुन घेतात. त्यानंतर व्यापाऱ्यांची नजर त्याच्या सातबाऱ्यावर असते. शेतकऱ्याला बोनसच्या रकमेचे लालच देवून सातबारा हस्तगत करतात. अशात शेतकरी आपला सातबारा सहज त्या व्यापाऱ्याला देवून टाकतो. हा प्रकार दरवर्षी छळणारा झाला आहे.यंदा जिल्ह्यात धानाचे उत्पादन रोगामुळे निम्यावर आलेले आहे. अशात बाहेरुन धान आणून विक्री करुन भरघोष मुनाफा प्राप्त करण्याचा डाव या व्यापाऱ्यांनी खेळला आहे. उत्तरप्रदेश राज्यात धानाला फार कमी भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांना माहिती होताच त्यांनी त्यापेक्षा जास्त भाव देवून तेथील धान खरेदी केला आहे. असे माहिती झाले की, येथील व्यापाऱ्यांनी युपी मधून येणारा धान १४०० ते १४५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे धान खरेदी केला आहे. तोच धान येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर १८६८ रुपये प्रति क्वींटल प्रमाणे विक्री होत आहे. त्यावर राज्य शासनाकडून ७०० रुपये प्रतिक्विंटल २५६८ रुपये प्रमाणे धानाला भाव मिळेल. परंतु प्रत्यक्षात येथील छोट्या शेतकऱ्यांकडे हमी भावात विक्रीसाठी धान उरलाच नाही. याच थेट लाभ घेण्यासाठी युपीचा धान खरेदी करीत आहे. यापासून व्यापाऱ्यांना १२०० रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास नफा मिळणार आहे.  यासाठी त्याला हवा आहे गावातील शेतकऱ्यांचा सातबारा. काही व्यापाऱ्यांनी तर सातबारा उतारा घेण्यासाठी शेतकऱ्यांची यादी तलाठ्यांकडे किंवा कोतवालाकडे देवून ठेवली आहे. अशावेळी तलाठी त्यांना थेट सातबारा देतील की प्रत्यक्ष संबंधीत शेतकऱ्यांच्या हातात देतील याबद्दल तलाठ्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. व्यापारी वर्ग सतत सातबारा संकलन करण्यासाठी धावप‌ळ करीत असताना दिसत आहे. या कामात मात्र व्यापाऱ्यांना यश लाभत आहे. कारण की दर ५० क्विंटल मागे जवळपास ३५००० रुपये बोनस मिळणार असून अर्धे बोनस शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन सातबारा देणाऱ्या व्यापाऱ्याला देत आहे.

आणेवारीला फरक पडणारयंदा धानाचे उत्पादन जवळपास निम्यावर असून धान खरेदीची मर्यादा सुद्धा प्रती एकर १३ क्विंटल करण्यात आली आहे. परंतु परराज्यातून धान आणून येथील धान खरेदी केंद्रावर विकल्यास धान विक्री दुप्पट दिसणार आहे. अशात शेतकऱ्यांची मदत मिळावी म्हणून चालणारी ओरड कोण ऐकणार? त्यामुळे शेतकऱ्यांनी सातबारा देताना अवश्य विचार करावा.

उत्तर प्रदेशातून धान विक्रीला आल्याबाबत व येथील धान खरेदी केंद्रावर विक्री होण्याबाबत कोणतीच तक्रार आपल्याकडे आलेली नाही. तक्रार आल्यास प्रकरणाची चौकशी करुन योग्य कारवाई अवश्य केली जाईल.- विश्वास सिरसाटउपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार सालेकसा

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी