पदमपूरच्या उडान संस्थेला ५० हजारांचा युवा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:30 IST2021-08-15T04:30:24+5:302021-08-15T04:30:24+5:30

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांना ...

50,000 award to Udampa Sanstha of Padampur | पदमपूरच्या उडान संस्थेला ५० हजारांचा युवा पुरस्कार

पदमपूरच्या उडान संस्थेला ५० हजारांचा युवा पुरस्कार

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन २०१९-२० या वर्षाचा युवा पुरस्कार आमगाव तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील उडान बहुउद्देशीय विकास संस्थेला जाहीर करण्यात आला आहे.

१५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री नवाब मलीक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. युवा पुरस्काराची निवड जिल्हास्तर युवा पुरस्कार निवड समितीने केली आहे. युवती गटात माधवी मोहन चुटेलकर यांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हास्तर युवा पुरस्कार (संस्था) करिता गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख ५० हजार रुपये, जिल्हास्तर युवा पुरस्कार (युवती) करिता गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख १० हजार रुपये देण्यात येणार, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी दिली आहे.

Web Title: 50,000 award to Udampa Sanstha of Padampur