बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:11 IST2017-12-21T00:11:20+5:302017-12-21T00:11:33+5:30

देवरी तालुक्याच्या मुरदोली येथील सुनील मधुकर कोरे (३०) याने गावातीलच नऊ वर्षाच्या मुलीवर दोन वेळा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला ५ वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

 5 years imprisonment for rape accused | बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ वर्षांचा कारावास

बलात्कार प्रकरणातील आरोपीला ५ वर्षांचा कारावास

ठळक मुद्देगुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला ५ वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देवरी तालुक्याच्या मुरदोली येथील सुनील मधुकर कोरे (३०) याने गावातीलच नऊ वर्षाच्या मुलीवर दोन वेळा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला ५ वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर सुनावणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश १ एस.आर.त्रिवेदी यांनी बुधवारी (दि.२०) केली.
देवरी पोलिसांनी आरोपी सुनील मधुकर कोरे (३०) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) (आय) (एन) सहकलम ४, ६, ८, बाल लैगिंक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला होता.
२८ जुलै २०१६ चे सायंकाळी ५ ते ६ वाजतादरम्यान पिडित नऊ वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष देवून जंगलात नेले. तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असता ती ओरडू लागली. यादरम्यान आरोपीने पळसाच्या पाने तिच्या तोंडात टाकून तोंड बंद केले. या घटनेच्या आठ दिवसांपूर्वी त्याने पिडितेला स्वत: घरी नेवून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भात आजीने गावातील पोलीस पाटलाकडे तक्रार केली होती. पोलीस पाटलाने देवरी पोलिसात तक्रार केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेडके यांनी तपास केला.
या प्रकरणात न्यायालयाने १२ साक्षदार तपासल्यानंतर आरोपीला कलम ३५४ अ अन्वये, १ वर्षाचा सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, ३५४ ब अंतर्गत तीन वर्षाचा सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड ठोठावला.
दंड न भरल्यास दोन महिन्याची शिक्षा, शारीरिक संबंधासाठी अपहरण केल्यामुळे कलम ३६६ अ अंतर्गत पाच वर्षाचा सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्याची शिक्षा, कलम ९ (एम), १० अंतर्गत ५ वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्याचा कारवासाची शिक्षा सुनावली.
दंडाच्या रुपात येणारी रक्कम पिडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. महेश चांदवानी यांनी काम पाहिले.
घरी जाऊन घेतले आजीचे बयान
या प्रकरणातील पिडितेची आई तिला जन्म दिल्यानंतर घरुन निघून गेली. काही दिवसाने वडिलाचे निधन झाले. त्यामुळे म्हाताऱ्या आजीकडे राहणाऱ्या या चिमुकलीवर अत्याचार झाला. आरोपीची तक्रार देण्यास घाबरणाऱ्या त्या आजीला धीर देण्यासाठी न्यायालयाने तिच्या घरी जावून बयान नोंदविले. गोंदिया येथील प्रथम न्यायदंडाधिकारी सहावे नितीन ढोके व सरकारी वकील महेश चांदवानी यांनी तिच्या आजीचे बयान घरी जाऊन नोंदविले.

Web Title:  5 years imprisonment for rape accused