५ हजार अंगणवाड्या होतील आदर्श

By Admin | Updated: April 20, 2017 01:04 IST2017-04-20T01:04:47+5:302017-04-20T01:04:47+5:30

महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून बालक व महिलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने राज्यातील आंगणवाड्यांची स्थिती

5 thousand anganwadis will be ideal | ५ हजार अंगणवाड्या होतील आदर्श

५ हजार अंगणवाड्या होतील आदर्श

नरेश रहिले  गोंदिया
महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून बालक व महिलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने राज्यातील आंगणवाड्यांची स्थिती सुधारण्यासाठी शासनाने पाऊल टाकले आहे. सन २०१७-१८ या वर्षात पहिल्या टप्यात राज्यातील ५ हजार आंगणवाडी केंद्रांना आदर्श आंगणवाडी केंद्र म्हणून तयार केले जाणार आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील १४४ आंगणवाड्यांचा समावेश आहे.
महिला व बाल विभागाद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत आंगणवाडीत ६ वर्षा पर्यंतच्या बालकांना पोषण आहार, टिकाकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, औपचारिक शालेय शिक्षण आंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून दिले जाते. राज्यात ९७ हजार २३० आंगणवाडी व ११ हजार ८४ मिनी आंगणवाडी आहेत. ५५३ एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प सुरू आहेत. आंगणवाडी केंद्रांचे रूपांतरण आदर्श आंगणवाडी केंद्रात करण्यासाठी बालकांना आनंददायी वातावरणात पुर्र्ण शालेय शिक्षण, आरोग्य व पोषण आहार दिला जाईल. किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल. राज्य सरकारच्या निधीतून आंगणवाडी केंद्रांना आदर्श करण्याची योजना आखण्यात आली. यामुळे पहिल्या टप्यात सन २०१८-१७ मध्ये ५ हजार आंगणवाडी आदर्श तयार करण्याची बाब विचारधीन होती. ती बाब न झाल्याने आता सन २०१७-१८ या वर्षाच्या पहिल्या टप्यात ५ हजार आंगणवाडी केंद्राचा दर्जा सुधारून त्यात मुलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सरकारने या योजनेंतर्गत भारनियमनावर आळा घालण्यासाठीे सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची व्यवस्था आंगणवाडी केंद्रात उपलब्ध करण्यात येईल. आंगणवाडी इमारतीला शैक्षणिक सहायता केंद्र म्हणून तयार केले जाणार आहे. बालकांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी ई-लर्निंग साहित्य दिले जाणार आहेत.
आदर्श आंगणवाडीच्या बालकांसाठी टेबल, खुर्ची, साहित्यावर आधारित शैक्षणिक साहित्य तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
आंगणवाडीचे बालके निरोगी राहावे यासाठी बालकांना व आंगणवाडी सेविकांना स्वच्छ भारत अभियानाची एक किट उपलब्ध करून दिली जाणार आहे. बालकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी विद्युत नसलेला वॉटर प्यूरिफायर दिला जाणार आहे. गर्भवती माता व बालकांचे वजन मोजण्यासाठी विद्युत वजन काटे, उंची माजेमाप यंत्र देणार आहेत. कुपोषित बालक व माता यांची वेळीच ओळख होऊन कुपोषणावर वेळीच नियंत्रण आणता येणार आहे.

१४४ अंगणवाड्यांची होणार निवड
राज्यात या योजनेंतर्गत स्वत:ची इमारत असणाऱ्या ६८ हजार आंगणवाडींची निवड होणार आहे. एका वर्षात सहा विभागात ५ हजार आंगणवाड्यांना आदर्श बनविण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १४४ आंगणवाडी आदर्श बनविल्या जाणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात प्रत्येक प्रकल्पातून १० आंगणवाड्यांना आदर्श बनविले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात १५७० आंगणवाडी व २४३ मिनी आंगणवाडी आहेत. यापैकी १५६४ आंगणवाडी व २३३ मिनी आंगणवाडी सुरू आहेत.
८४.५० कोटी खर्चाची तरतूद
राज्य सरकारने ५ हजार आंगणवाडी आदर्श करण्यासाठी ८४.५० कोटीची तरतूद केली आहे. यातून जिल्हास्तराव प्रबोधन, जनजागृती कार्यशाळा ३६ लाख, आदर्श आंगणवाड्यांचा दरवर्षीचा खर्च ५२.५० कोटी, जिल्ह्यात उत्कृष्ट आंगणवाडी पुरस्कार ५४ लाख, राज्यात उत्कृष्ट आंगणवाडी पुरस्कार २ लाख रुपये, प्रशासकीय खर्च १.०२ कोटी रूपयांचा समावेश आहे. दर आंगणवाडीला १ लाख ६५ हजार रूपयाचा सौर उर्जा संच, शैक्षणिक साहित्य, ई-लर्निंग, खुर्र्ची-टेबल, स्वच्छ भारत किट, वॉटर प्यूरिफायर, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, उंची मोजण्याची टेप व इतर देखभालीवर खर्च होणार आहे.

 

Web Title: 5 thousand anganwadis will be ideal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.