४९६ उमेदवारांची पोलीस भरतीला दांडी
By Admin | Updated: June 9, 2014 23:40 IST2014-06-09T23:40:58+5:302014-06-09T23:40:58+5:30
जिल्ह्यात पोलीस शिपाई पदाच्या ७६ जागांसाठी होत असलेली पोलीस भरती तीव्र ऊन्हात होत असल्याने याचा तडाखा भरतीसाठी येणार्या घेण्यात येत असल्याने उन्हाच्या तडाख्यामुळे ४९३ उमेदवार मागील चार

४९६ उमेदवारांची पोलीस भरतीला दांडी
अपात्रतेचा फटका : उन्हापासून बचावासाठी उपाययोजना
गोंदिया : जिल्ह्यात पोलीस शिपाई पदाच्या ७६ जागांसाठी होत असलेली पोलीस भरती तीव्र ऊन्हात होत असल्याने याचा तडाखा भरतीसाठी येणार्या घेण्यात येत असल्याने उन्हाच्या तडाख्यामुळे ४९३ उमेदवार मागील चार दिवसात गैरहजर राहिले आहेत. याशिवाय तीन दिवसात २८३ उमेदवार शारीरिक चाचणीत व कागदपत्र तपासणीत अपात्र ठरले आहेत. दरम्यान उमेदवारांना उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी पोलीस विभागातर्फे अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात ७६ पोलीस शिपाई पदासाठी होत असलेल्या भरतीची शारीरिक चाचणी ६ जूनपासून सुरू करण्यात आली. भरती प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी दररोज विशिष्ट उमेदवारांना बोलाविण्यात आले. पहिल्या दिवशी बोलविलेल्या ३00 उमेदवारांपैकी १४0 उमेदवार गैरहजर राहीले. हजर असलेल्यांपैकी ६५ जण अपात्र तर ८0 उमेदवार पात्र ठरले आहेत.
यातील १५ उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी १४ रोजी बोलाविण्यात आले. ७ जून रोजी ४५0 उमेद्वारांना बोलाविले होते. यातील ३१४ उमेदवार हजर तर १३६ उमेदवार गैरहजर राहीले. त्यैपीक ११८ उमेदवार अपात्र ठरले. यातील २0 उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी १४ रोजी बोलाविण्यात आले आहे.
८ जूनला ५00 उमेद्वारांना बोलाविले होते. यातील ९९ उमेदवार गैरहजर राहीले. हजर असलेल्यांपैकी १00 उमेदवार अपात्र ठरले. यातील १४ उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी १४ रोजी बोलाविण्यात आले आहे. ९ जूनला रोजी ६00 उमेद्वारांना बोलाविले होते. यातील ११८ उमेदवार गैरहजर राहीले. हजर असलेल्यांची पाच किमी धावण्याची चाचणी मंगळवारी पहाटे ५ वाजतादरम्यान घेण्यात येणार आहे.
उन्हाच्या तडाख्यापासून उमेदवारांचा बचाव व्हावा यासाठी मुख्यालयाच्या मैदानावर शामियान्याची संख्या वाढविण्यात आली आहे. सोबतच वैद्यकीय चमू ठेवण्यात आली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा गोंदिया जिल्हयातील दूर अंतरावरून आलेल्या उमेदवारांची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांच्यासाठी राहण्याची सोय पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पोलीस मुख्यालयाच्या बॅरेकमध्ये केली आहे. उन्हापासून बचाव म्हणून शारीरिक चाचणी देणार्यांसाठी ग्लुकोज, पाणी व इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)