४९ हजारांची दारू व सडवा पकडला

By Admin | Updated: June 29, 2015 01:14 IST2015-06-29T01:14:41+5:302015-06-29T01:14:41+5:30

येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात दारू तयार केली जात ...

49 thousand liquor and straw caught | ४९ हजारांची दारू व सडवा पकडला

४९ हजारांची दारू व सडवा पकडला

तिरोडा : येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात दारू तयार केली जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पाच ठिकाणी छापे मारून १३० लिटर हातभट्टीची दारू व १०५६ किलो (८८ पोती) सडवा जप्त करण्यात आला आहे. येथील संत रविदास वॉर्डात आबकारी विभाग व तिरोडा पोलिसांंनी संयुक्तरीत्या शनिवारी (दि.२७) ही कार्यवाही केली.
यामध्ये, विनोद राधेशाम खरोले (३६) कडून ३० लिटर हातभट्टीची दारू व १६८ किलो सडवा असा आठ हजार २२० रुपयांचा माल, मंगलेश श्रावण कनोजे (२२) कडून २० लिटर हातभट्टीची दारू व १२० किलो सडवा व रसायन असा पाच हजार ८०० रुपयांचा माल, सविता सेवकराम तांडेकर (४०) कडून ३० लिटर हातभट्टीची दारू व ३१२ किलो सडवा व रसायन असा १२ हजार ९८० रुपयांचा माल, शकुंतला कुवरदास बिंझाडे (५५) कडून ५० लिटर हातभट्टी दारू २ हजार ५०० रुपयांचा माल तसेच माया शामराव झाडे (३२) कडून ४५६ किलो सडवा व रसायन असा १८ हजार २४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
अशाप्रकारे ४२ हजार २४० रपये किंमतीचा ८८ पोत्यांत १०५६ किलो सडवा व सहा हजार ५०० रूपये किंमतीची १३० लिटर हातभट्टीची असा एकूण ४८ हजार ७४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार, स्वप्नील उनवने, पोलीस उपनिरीक्षक योगेश इंगळे, आबकारी विभागाचे निरीक्षक बाळू भगत व त्याचे पथक तसेच पोलीस हवालदार शंकर गायधने, राजेश पांडे, बबन शेंडे, राकेश दोनोडे, रोशन गोंडाणे, अतुल गायधने, खुशाल चौधरी, वेदेश दिघोरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 49 thousand liquor and straw caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.