४.८७ लाखांचा मोहा सडवा व दारू केली जप्त ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:32 IST2021-08-27T04:32:20+5:302021-08-27T04:32:20+5:30

तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन वॉश आऊटअंतर्गत तिरोडा पोलिसांनी शहर व परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांवर ...

4.87 lakh tempted and liquor confiscated () | ४.८७ लाखांचा मोहा सडवा व दारू केली जप्त ()

४.८७ लाखांचा मोहा सडवा व दारू केली जप्त ()

तिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन वॉश आऊटअंतर्गत तिरोडा पोलिसांनी शहर व परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांवर छापा घालून त्यांच्याकडील चार लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मोहा सडवा व दारू जप्त केली. पोलिसांनी गुरुवारी (दि.२६) दुपारी हे छापासत्र राबविले आहे.

याअंतर्गत, सुखवंता बाबुराव बरिकर, रा. संतरविदास वॉर्ड, तिरोडा यांच्या घरातून २५ प्लास्टिक चुंगडीत ८० हजार रुपये किमतीचा १००० किलो मोहा सडवा, शकुंतला कुवारदास बिंझाडे रा. संतरविदास वॉर्ड यांच्या घरातून ४८ प्लास्टिक चुंगडीत एक लाख ५३ हजार ६०० रुपये किमतीचा १९२० किलो सडवा, मिलन कुवरदास बिंझाडे, रा. संतरविदास वॉर्ड याच्या घरातून ४५ प्लास्टिक चुंगडीत एक लाख ४४ हजार रुपये किमतीचा १८०० किलो मोहा सडवा, संजय सोविंद बरेकर, रा. रामाटोळी सिली याच्या घरातून ६५ प्लास्टिक चुंगडीत एक लाख आठ हजार ८०० रुपये किमतीचा १३६० किलो, तर पिंटू ऊर्फ नीतेश अशोक नेमपाडे, रा. करटी याच्या दुकानातून एक हजार रुपये किमतीची १० लिटर मोहा दारू जप्त असा एकूण चार लाख ८७ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश पारधी, महिला पोउपनि राधा लाटे, हवालदार उईके, नापोशी श्रीरामे, बर्वे, बांते, रक्षे, कुलमते, भुमेश्वरी तिरळे, प्रधान, शिपाई विदेश अंबुले, येरणे, कोरचे, महिला शिपाई नंदा बडवाईक व येडे यांनी केली.

Web Title: 4.87 lakh tempted and liquor confiscated ()