४७५१ विद्यार्थी देणार टीईटीचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:08+5:30

दुसरा पेपर देणारे ६४१ उमेदवार असून दोन्ही पेपर देणारे ८८९ उमेदवार आहेत. इंग्लीश माध्यमाचा पहिला पेपर देणारे २१, दुसरा पेपर देणारे ४२ तर दोन्ही पेपर देणारे ४१ उमेदवार आहेत.उर्दुचा दुसरा पेपर देणारा एक तर दोन्ही पेपर देणारा एक विद्यार्थी आहे.

4751 students will give TET paper | ४७५१ विद्यार्थी देणार टीईटीचा पेपर

४७५१ विद्यार्थी देणार टीईटीचा पेपर

ठळक मुद्दे२० केंद्रावरून परीक्षा : १९ जानेवारी रोजी पेपर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चा पेपर १९ जानेवारी २०२० रोजी जिल्ह्यातील २० केंद्रांवरून घेण्यात येणार आहे. पहिला पेपर १२ केंद्रांवरून दोन हजार ९०० उमेदवार तर दुसरा पेपर आठ केंद्रांवरून एक हजार ८५१ उमेदवार असे दोन्ही पेपर चार हजार ७५१ उमेदवार देणार आहेत.
शहरातील जे.एम.हायस्कूल सिव्हील लाईन्स, मनोहर म्युनिसीपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राजस्थान कन्या हायस्कूल, मनोहर म्युनिसीपल हायर सेकंडरी स्कूल, बी.एन. आदर्श सिंधी हायस्कूल, एस.एस.गर्ल्स हायस्कूल, महावीर मारवाडी हायस्कूल, एस.एस.गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालय, बी.एच.जे. कॉलेज, जे.एम.हायस्कूल (मुख्य), रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, निर्मल इंग्लीश स्कूल, श्रीमती सरस्वतीबाई महिला विद्यालय, गुजराती राष्ट्रीय हायस्कूल १४ शाळांमध्ये केंद्र आहेत.पहिल्या पेपरचे १२ केंद्र तर दुसऱ्या पेपरचे आठ केंद्र राहणार आहेत.मराठी माध्यमाचा पहिला पेपर एक हजार ५१२ उमेदवार देणार आहेत.
तर दुसरा पेपर देणारे ६४१ उमेदवार असून दोन्ही पेपर देणारे ८८९ उमेदवार आहेत. इंग्लीश माध्यमाचा पहिला पेपर देणारे २१, दुसरा पेपर देणारे ४२ तर दोन्ही पेपर देणारे ४१ उमेदवार आहेत.उर्दुचा दुसरा पेपर देणारा एक तर दोन्ही पेपर देणारा एक विद्यार्थी आहे.
हिंदी भाषेचा पहिला पेपर देणारे २७४, दुसरा पेपर देणारे ८३ तर दोन्ही पेपर देणारे १५० उमेदवार आहेत. बंगाली विषयाचा पहिला पेपर देणारे १०, दुसरा पेपर देणारा एक तर दोन्ही पेपर देणारे दोन उमेदवार आहेत.

Web Title: 4751 students will give TET paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.