शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

४५ हजार कामगारांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 21:42 IST

इमारत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून वर्षभरात ४५ हजार पेक्षा जास्त कामगारांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करविली आहे. अचानकच एवढ्या मोठ्या संख्येत वाढ झाल्याने आश्चर्य व संशयही व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देअचानकच झाली वाढ : चौकशी करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : इमारत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून वर्षभरात ४५ हजार पेक्षा जास्त कामगारांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करविली आहे. अचानकच एवढ्या मोठ्या संख्येत वाढ झाल्याने आश्चर्य व संशयही व्यक्त केला जात आहे.शासनाकडून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व अन्य निर्माणकार्य कामगार कल्याणकारी मंडळात केली जाते. मागील वर्षी यात फक्त ८ हजार कामगारांची नोंद करण्यात आली होती. मात्र यंदा ४५ हजार पेक्षा जास्त कामगारांची नोंद करण्यात आली आहे. अचानक एवढ्या मोठ्या संख्येत कामगारांची नोंद वाढल्याने अश्चर्य व शंका व्यक्त केली जात आहे.४ जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम करणाऱ्या मजुरांची विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली. यांतर्गत २२ हजार ४९१ मजुरांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर मात्र नोंदणीकडे त्यांचा कल वाढत गेला असून सहायक कामगार आयुक्त कार्यालयात आठवड्यातील पहिले तीन दिवस मजुरांची नोंदणीसाठी चांगलीच गर्दी दिसून येते.नोंदणीसाठी कोणत्याही कंत्राटदाराकडे ९० दिवस इमारत बांधकामासाठी काम केल्याचे प्रमाणपत्र कामगाराला सादर करावे लागते. मात्र या योजनेंतर्गत फक्त ४ कंत्राटदारांनी नोंदणी करविल्याची माहिती आहे.वास्तवीक, १० लाखांपेक्षा जास्तीचे काम करणाऱ्या १० मजुरांना काम देणाऱ्या कंत्राटदारांचीच या योजनेत नोंदणी होते. मात्र बहुतांश कंत्राटदार फक्त ७-८ मजुरांनाच काम दिल्याचे सांगत असून नोंदणीपासून सुटतात.परिणामी कित्येक मजुरांना कंत्राटदारांकडून मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध करवून देण्याची जबाबदारी शासनावर येते. अशात अचानक एका वर्षातच शासनाला नोंदणी झालेल्या मजुरांवर लाखो रूपये खर्च करावे लागणार आहेत. याचे परिणाम येत्या १-२ वर्षांत बघावयास मिळतील. अशात याची चौकशी करण्याची गरज दिसून येत आहे.कामगारांना असा मिळणार लाभनोंदणी होताच कामगार ५ हजार रूपयांची आर्थिक मदत मिळविण्याचे हकदार बनतात. अशात या ४५ हजार कामगारांपैकी सुमारे ४० हजार कामगार या रकमेचे हकदार बनले आहेत. ही रक्कम त्यांना कुदाळ, फावडा, घमेले विकत घेण्याच्या नावावर दिली जाते. शिवाय, कामगारांच्या अपत्यांना शिष्यवृत्ती, कामगार किंवा त्याच्या अपत्यांच्या विवाहासाठी ३० हजार रूपये, गंभीर आजारावर १ लाख रूपये, मृत्यू झाल्यास अंतीम संस्कारासाठी १० हजार रूपये, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २५ हजार रूपये ५ वर्षांपर्यंत, कामगाराचा मृत्यू कामादरम्यान झाल्यास ५ लाख रूपये व मृत्यू नैसर्गिक असल्यास २ लाख रूपयांची आर्थिक मदत दिली जाते.