४४० सेवानिवृत्त शिक्षकांची सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यासाठी फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST2021-02-06T04:53:37+5:302021-02-06T04:53:37+5:30
शिक्षण विभागाने खासगी अनुदानित शाळेतील निवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगानुसार पहिल्या हप्ताच्या कालावधीची संबंधित शाळेकडून वेतन ...

४४० सेवानिवृत्त शिक्षकांची सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यासाठी फरफट
शिक्षण विभागाने खासगी अनुदानित शाळेतील निवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगानुसार पहिल्या हप्ताच्या कालावधीची संबंधित शाळेकडून वेतन देयके स्वीकारली. निवृत्त कर्मचाऱ्यांना ही रक्कम जुलै २०२० पूर्वी देण्याचे शासनाचे आदेश असून, ती अद्यापही देण्यात आली नाही. शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. थकीत रकमेसाठी शिक्षक वारंवार जि. प. शिक्षण विभागाच्या पायऱ्या झिजवित आहेत. शिक्षण विभागाकडून नेहमीच अनुदान उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात आहे, मात्र गोंदिया वगळता इतर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ही रक्कम देण्यात आली आहे. मग गोंदियातच अडचण का? असा सवाल सेवानिवृत्त शिक्षकांनी केला आहे. दरम्यान, भाजप शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी शिक्षण अधिकारी प्रफुल्ल कचवे यांची भेट घेऊन सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्याची रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शिष्टमंडळात अरुण पारधी, पंढरी तुरकर, लीलेश्वर बोरकर, सतीश मंत्री, चरणदास डहारे, सनत मुरकुटे, मधुकर कुरसुंगे, दुधराम राऊत, लक्ष्मण आंधळे यांचा सहभाग होता.