४३५ गावांत एक गाव एक गणपती

By Admin | Updated: September 10, 2015 02:04 IST2015-09-10T02:04:04+5:302015-09-10T02:04:04+5:30

एका गावात अनेक गणेश मूर्ती असायच्या. त्यातून माझी गणपतीची आकर्षक झाकी, आकर्षक कार्यक्रम असावेत, लोकांचा कल आमच्या मूर्तीकडे असावा अशा भावनेतून गणेश उत्सव मंडळांकडून कार्य केले जात होते.

435 villages, one village one Ganapati | ४३५ गावांत एक गाव एक गणपती

४३५ गावांत एक गाव एक गणपती

तंटामुक्तीचे कार्य अविरत सुरू : जातीय सलोखा राखण्यास तंटामुक्त समितीचा पुढाकार
नरेश रहिले गोंदिया
एका गावात अनेक गणेश मूर्ती असायच्या. त्यातून माझी गणपतीची आकर्षक झाकी, आकर्षक कार्यक्रम असावेत, लोकांचा कल आमच्या मूर्तीकडे असावा अशा भावनेतून गणेश उत्सव मंडळांकडून कार्य केले जात होते. यामुळे एकाच गावावतील अनेक गणेश मंडळांचे वाद व्हायचे. यातून गावाची शांतता धोक्यात येत होती. या उत्सवादरम्यान गावाची शांतताअबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना जिल्ह्यातील ५५६ पैकी ४३५ गावांत यंदाही संकल्पना राबविली जात आहे.
संपूर्ण जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेल्या गणेशोत्सवाला १७ सप्टेंबर पासून सुरूवात होत आहे. जिल्हाभरात यावर्षी ९९० सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येत आहे. तर ४ हजार ७१० खासगी मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५ हजार ७०० ठिकाणी श्रींची स्थापना करण्यात येणार आहे.
एक गाव एक गणपतीची संकल्पना आमगाव, सालेकसा, गोंदिया शहर, रागनगर, गोंदिया ग्रामीण, रावणवाडी, गोरेगाव, तिरोडा, गंगाझरी, दवनीवाडा, डुग्गीपार, देवरी, चिचगड, अर्जुनी/मोरगाव, केशोरी, नवेगावबांध या पोलिस ठाण्यांतर्गत राबविण्यात येत आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने एक गाव एक गणपतीची संकल्पना साकारण्यास मदत झाली आहे. गोंदिया शहर पोलिस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ८० तर खासगी १००० मूर्ती स्थापन केली जाणार आहेत.रामनगर सार्वजनिक ४० तर खासगी ५०० मूर्ती, गोंदिया ग्रामीण सार्वजनिक ४० तर खासगी १७० मूर्ती, रावणवाडी सार्वजनिक ७० तर खासगी ३२५ मूर्ती, तिरोडा सार्वजनिक ४५ तर खासगी २४० मूर्ती, दवनीवाडा सार्वजनिक २० तर खासगी ६५ मूर्ती, गंगाझरी सार्वजनिक ५५ तर खासगी १७० मूर्ती, आमगाव सार्वजनिक ७५ तर खासगी ६५० मूर्ती, सालेकसा सार्वजनिक ११० तर खासगी १७५ मूर्ती,गोरेगाव सार्वजनिक ४० तर खासगी १५० मूर्ती, देवरी सार्वजनिक ५५ तर खासगी १२० मूर्ती, चिचगड सार्वजनिक ७० तर खासगी ५० मूर्ती, डुग्गीपार सार्वजनिक ८० तर खासगी २८० मूर्ती, नवेगावबांध सार्वजनिक २५ तर खासगी १५० मूर्ती, अर्जुनी-मोरगाव सार्वजनिक १६० तर खासगी ४५० मूर्ती, केशोरी सार्वजनिक २५ तर खासगी ३५ मूर्ती स्थापन करण्यात येणार आहेत. उत्सवादरम्यान गावात शांतता राखण्यासाठी समित्या प्रयत्न करणार आहेत.
चोख बंदोबस्तासाठी पथके होणार
गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिसांकडून पथके तयार करण्यात येणार आहेत. दंगल नियंत्रक तीन पथक नियंत्रण कक्षात ठेवण्यात येणार आहेत. गरज भासल्यास त्या ठिकाणी या पथकांना पाठविता येणार आहे. या तीन पथकात तीन अधिकारी व ३७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी एक ट्रॅकींग फोर्स, पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्येकी एक ट्रॅकींग फोर्स असे सहा फोर्स तयार करण्यात आले आहेत. त्यात सहा अधिकारी व ५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तीन पथक पोलीस मुख्यालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यात दोन सी-६० चे पथक राहणार आहेत. शिवाय बॉम्बशोध, नाशक पथकही नेमण्यात आले आहे.
सुरक्षा दल राहणार सज्ज
गावातील सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेतला. गावातील सण, उत्सव, मेळावे, महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी पोलीस बंदोबस्ताशिवाय पार पाडता याव्या यासाठी तंटामुक्त समित्यांनी आपापल्या गावात ग्राम सुरक्षा दलाला सज्ज केले आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी उत्सव मंडळ व ग्राम सुरक्षा दलाने पुढाकार घेतला आहे.
मंडळाना आवाहन
गपणती उत्सव साजरा करताना गणेशोत्सव मंडळांनी चोरीची वीज वापरू नये, मूर्ती मांडलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी पडणार नाही, मूर्तीच्या सुरक्षेसाठी संपूर्ण जबाबदारी मंडळाच्या सदस्यांनी करावी, जनावरे मंडपात येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमगावचे ठाणेदार फागु औटी यांनी केले आहे.

Web Title: 435 villages, one village one Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.