रिक्षा चालकांना ४३ लाखांची विमा सुरक्षा
By Admin | Updated: December 13, 2014 22:42 IST2014-12-13T22:42:20+5:302014-12-13T22:42:20+5:30
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त युवा शक्ती प्रतिष्ठान, युवा शक्ती फाऊंडेशन, गोंदिया जिल्हा तालुका पत्रकार संघ व भाजप कार्यकर्त्यांनी संघर्ष सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबवून

रिक्षा चालकांना ४३ लाखांची विमा सुरक्षा
आमगाव : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त युवा शक्ती प्रतिष्ठान, युवा शक्ती फाऊंडेशन, गोंदिया जिल्हा तालुका पत्रकार संघ व भाजप कार्यकर्त्यांनी संघर्ष सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबवून गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाला पुढे करून रिक्षा चालकांना ४३ लाख रुपयांच्या विमा पॉलिसीचे वितरण केले.
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती संघर्ष सप्ताहनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजीव शक्करवार, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक बी.डी. मडावी, तालुका आरोग्य अधिकारी चंदु वंजारे, पंचायत समिती सदस्य रमेश साखरे, प्रमोद कटकवार, ज्योती खोटेले, सरपंच सुषमा भुजाडे, महेंद्र डोहरे तसेच कार्यक्रम संयोजक यशवंत मानकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन व गोपीनाथ मुंडे यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण व पूजन करुन पाहुण्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक बी.डी. मडावी यांनी गोपीनाथ मुंडे यांनी सामान्यांसाठी न्याय मिळविण्यासाठी सतत संघर्ष केला. त्यांच्या ध्येयाला घेऊन विविध संघटनांनी केलेले उपक्रम आर्थिक दुर्बल घटकांसाठी लाभाचे ठरणार आहे. अशा उपक्रमाची समाजात आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार राजीव शक्करवार यांनी समाजात संघर्ष करीत असलेले मजूर, कामगार, रिक्षाचालक यांचा जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजकार्य करणाऱ्या संस्थांनांनी पुढे आल्यास अधिक बळ मिळेल, या आर्थिक दुर्बलांसाठी काम करण्याचे ध्येय आयोजकांनी साकार केले आहे. त्यांच्या उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी पुढे असणार असे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी रमेश साखरे, चंदू वंजारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते रिक्षा चालकांना ४३ लाखांची विमा पॉलिसी, उनी कापडाचे वस्त्र व ओळखपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम संयोजक यशवंत मानकर यांनी केले. संचालन राजीव फुंडे व आभार रितेश अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमात दिनेश उजवणे, भरत चुटे, नरेंद्र शर्मा, प्रकाश पारवे, मुकेश हलमारे, रवि क्षीरसागर उपस्थित होते.
जयंती कार्यक्रमात समाजसेवक प्रमोद कटकवार, राकेश, निखील कोसरकर, कमलेश चुटे, राजेश मानकर, डॉ. रवि शेंडे, रघुनाथ भूते, अनिल शेंडे, नरेंद्र बाजपेयी, युवा शक्ती प्रतिष्ठान, युवा शक्ती फाऊंडेशन, गोंदिया जिल्हा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच भाजप कार्येकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)