४२६५ किलो तेल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:17+5:30
खाद्य तेल साठविण्यासाठी वापरण्यात येणारे टँक हे कायद्यातील तरतुदी नुसार नव्हते. एकच टँकचा वापर सर्व तेल साठविण्यासाठी आलटून पटलून होत होता. यावर पथकाने धाड घालून मिल मधून तीन लाख २४ हजार ४४१ रु पये किंमतीचे चार हजार २६५ किलो रिफाईंड सोयाबीन तेल, रिफाईंड पाम तेल व रिफाईंड तेल जप्त केले.

४२६५ किलो तेल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी (दि.२४) शहरात विशेष मोहीम राबवून गौशाला वॉर्डातील गुरु नानक तेल भंडार या मीलवर धाड घालून चार हजार २६५ किलो तेल जप्त केले.
अधिकाऱ्यांनी सदर मिलच्या परवाना बाबत चौकशी केली असता सदर मिलला फक्त सोयाबीन व कॉटन तेल रिपॅक करण्याची परवानगी होती. परंतु तेथे पाम तेलचे रिपॅकिंग होत असल्याचे आढळले. तसेच खाद्य तेल साठविण्यासाठी वापरण्यात येणारे टँक हे कायद्यातील तरतुदी नुसार नव्हते. एकच टँकचा वापर सर्व तेल साठविण्यासाठी आलटून पटलून होत होता. यावर पथकाने धाड घालून मिल मधून तीन लाख २४ हजार ४४१ रु पये किंमतीचे चार हजार २६५ किलो रिफाईंड सोयाबीन तेल, रिफाईंड पाम तेल व रिफाईंड तेल जप्त केले.
मीलमधून रिफाईंड सोयाबीन तेलाच्या नावाने पाम तेलची विक्र ी होत होती. विश्लेषण अहवाल आल्यावर अन्न सुरक्षा व मनाद कायदा अंतर्गत मिल मालक हरीश सत्तानी यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सदर कारवाई सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त जयंत वाणे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी अ.दा. राऊत व पियुष व्ही. मानवतकर यांनी केली. विशेष म्हणजे, बुधवारी (दि.२३) शहरातील मूर्री रस्त्यावरील शिव ऑईल मील मध्ये १४ हजार किलो रिफाईन सोयाबीन तेल किंमत ११ लाख २० हजार, १००० किलो पामोलीन तेल किंमत १ लाख, ९०९ किलो रिाफाईन कॉटन तेल किंमत ९० हजार रूपये असा साठा जप्त करण्यात आला होता. या दोन दिवसांत गोंदिया झालेली कारवाई ही विदर्भातील सर्वात मोठी कारवाई आहे.