जिल्हाभरातील ४२० शस्त्रे झाली जमा
By Admin | Updated: October 6, 2014 23:14 IST2014-10-06T23:14:35+5:302014-10-06T23:14:35+5:30
निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच घातपात होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र परवानाधारकांना आपले शस्त्र संबंधित

जिल्हाभरातील ४२० शस्त्रे झाली जमा
गोंदिया : निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच घातपात होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र परवानाधारकांना आपले शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्याचे निर्देश दिले जाते. गोंदिया जिल्ह्यातील ५२३ शस्त्र परवानाधारक असून यातील ४२० जणांनी शस्त्र जमा केले आहे. उर्वरित ६९ जणांनी अजूनही शस्त्र जमा केले नाही.
गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत ५९ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ३६ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु २१ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत १५ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ६ जणांनी शस्त्र जमा केले. यातील ११ जणांना शस्त्र आवश्यक असल्यामुळे परत घेता येत नाही. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत ४९ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील २४ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु २० जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. यातील ५ जणांना स्वत:कडे शस्त्र ठेवणे आवश्यक आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ७ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ५ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु २ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत ३९ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ३० जणांनी शस्त्र जमा केले. परंतु ८ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही.
एका व्यक्तीला शस्त्र ठेवणे आवश्यक आहे. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत १३ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील १३ जणांनी शस्त्र जमा केले. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ११ शस्त्र परवानाधारक आहेत.
यातील ९ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु २ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत १९ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील १९ जणांनी शस्त्र जमा केले. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ८ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ६ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु २ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत ३९ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ३९ जणांनी शस्त्र जमा केले. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत ६१ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ६० जणांनी शस्त्र जमा केले. एका व्यक्तीला शस्त्र ठेवणे आवश्यक आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ६२ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ६२ जणांनी शस्त्र जमा केले. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत १५ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील १ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु १४ जणांना शस्त्र ठेवणे आवश्यक आहे. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत ४३ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ४३ जणांनी शस्त्र जमा केले.
अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ६३ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ४६ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु १४ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. तर ३ जणांना शस्त्र ठेवणे आवश्यक आहे. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत २१ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील २१ जणांनी शस्त्र जमा केले.
जिल्ह्यात ५२३ शस्त्र परवानाधारक असून ४२० जणांनी शस्त्र जमा केले आहे. तर गरज नसलेल्या ६९ परवानाधारकांचे शस्त्र अजूनही संबंधित पोलीस ठाण्यात जमा झालेले नाही.