वसतिगृहातील ४०० विद्यार्थिनींना खाटा नाही

By Admin | Updated: September 28, 2016 01:09 IST2016-09-28T01:09:28+5:302016-09-28T01:09:28+5:30

विशेष समाज कल्याण विभागामार्फत नव्याने गोंदिया,देवरी, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी या चार ठिकाणी

400 students in the hostel do not have a bed | वसतिगृहातील ४०० विद्यार्थिनींना खाटा नाही

वसतिगृहातील ४०० विद्यार्थिनींना खाटा नाही

नवीन मंजूर वसतिगृह: जागेअभावी सडक-अर्जुनीचे वसतिगृह सुरू झालेच नाही
गोंदिया : विशेष समाज कल्याण विभागामार्फत नव्याने गोंदिया,देवरी, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी या चार ठिकाणी प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींसाठी वसतीगृह शासनाने मंयूर केले. सडक-अर्जुनी येथे जागेअभावी वसतीगृह सुरू होऊ शकले नाही. तीन ठिकाणी विद्यार्थीनींची प्रवेश प्रक्रीयाही सुरू करण्यात आली. परंतु नविन वसतीगृहाला अद्याप शासनाने खाटा पुरविल्या नाही.
यापूर्वीचे गोंदिया जिल्ह्यात चार वसतीगृह आहेत. गोंदिया मुलींच्या वसतीगृहात ७५ विद्यार्थी क्षमता असून ५२ प्रवेश घेण्यात आले. गोंदिया मुलांच्या वसतीगृहात ८० विद्यार्थी क्षमता असून ६१ प्रवेश घेण्यात आले. तिरोडा मुलींच्या वसतीगृहात १०० विद्यार्थी क्षमता असून ४२ प्रवेश घेण्यात आले.
अर्जुनी-मोरगाव मुलांच्या वसतीगृहात १०० विद्यार्थी क्षमता असून ४९ प्रवेश घेण्यात आले. प्रवेश प्रक्रीया अजूनही सुरूच आहे. त्यांना चादर, गादी, ब्लॅकेट, उशी देण्यात येते. सर्वच सोयीसुविधा या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आहे.
परंतु नविन वसतीगृहात प्रवेश प्रक्रीया सुरू होत असून खाटांची व्यवस्था नसल्याने विद्यार्थीनींवर खाली झोपण्याची पाळी येऊ शकते. (जिल्हा प्रतिनिधी)


शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज
शिष्यवृत्तीसाठी शासनाने सहा लाख रूपये मर्यादा ठेवली असताना शिष्यवृत्तीसाठी अर्ज वाढले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पध्दतीने अर्ज करावे असे आवाहन समाज कल्याणचे उपायुक्त मंगेश वानखेडे यांनी केले आहे.

Web Title: 400 students in the hostel do not have a bed