४० टक्के कुटूंब आजही गवताच्या छताखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:40+5:30

महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्याने या परिसराला व्यापले आहे. मधात ६-७ किमी चा मोकळा परिसर असलेल्या या टापूवर लोकवस्ती कशी वसली असेल याची कल्पना केली म्हणजे आश्चर्य वाटते.

40% of families still live under a thatched roof | ४० टक्के कुटूंब आजही गवताच्या छताखालीच

४० टक्के कुटूंब आजही गवताच्या छताखालीच

googlenewsNext
ठळक मुद्देघरकुल योजनेचा पत्ताच नाही : सर्वांना घराचे केवळ स्वप्नच, मुरकुडोह दंडारीवासीयांची उपेक्षाच

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना त्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तालुक्यातील मुरकुडोह दंडारी वसाहतीला भेट दिल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता फारच दूर असल्याचे दिसून येते. येथील चाळीस टक्के कुटुंब अद्यापही गवताच्या छताखाली वास्तव्य करीत आहे. त्यांच्या स्वप्नातील पक्क्या घराचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार हा प्रश्न कायम आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्याने या परिसराला व्यापले आहे. मधात ६-७ किमी चा मोकळा परिसर असलेल्या या टापूवर लोकवस्ती कशी वसली असेल याची कल्पना केली म्हणजे आश्चर्य वाटते. काही स्थानिक लोकांच्या सांंगण्यावरुन वन संपत्ती गोळा करण्यासाठी वन वन भटकणारा आदिवासी समाजाचा घनदाट जंगलात व नदी खोºयात टोळीचा वावर असायचा. कदाचित वन उपज गोळा करुन आपल्या मुलभूत गरज भागविण्यासाठी आदिवासी लोकांची टोळी या भागात गेली असावी.
हा भूभाग इतर लोकवस्तीपासून दूर असल्याने त्यांना सूर्यास्तपूर्वी परत जाणे शक्य न झाल्यामुळे त्या लोकांच्या टोळी येथील मोकळ्या भूभागावर आपला डेरा स्थापन केला असावा कालांतराने येथे त्या टोळीचे कुटूंब बिस्तारले आणि वस्ती निर्माण झाली. आधी काळापासून ज्या मूलभूत गरजासाठी लोकांना वन वन भटकावे लागत होते. आजही येथील लोकांचे जीवन या गरजा पूर्ण करण्यापूर्वीच अडकले आहे असे दिसून आले. येथील पाचही गावांमध्ये एकही पक्के घर दिसून आले नाही. येथील बहुतेक घरे मातीची व कौलारु छताचे आहेत. त्यातच ४० टक्के घरे फक्त बांबू आणि गवताच्या छताचे तसेच बांबूच्या भिंती असलेले दिसून येतात.
या गावामध्ये अनेक कुटुंबाना साधे कौलारु घरे सुध्दा नशीबी नाही तर मग पक्के घर केव्हा हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.मागील ३०-४० वर्षापासून केंद्र शासनाची आवास योजना सुरू असून सुध्दा एवढ्या वर्षात येथील एकाही कुटूंबाला घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. दर घरकुल योजना या गावापर्यंत पोहचलीच नसल्याचे चित्र आहे.

मंजूर झाले तरी घरकुल बनले नाही
मुरकुडोह-दंडारी या गावांचा समावेश ग्रामपंचायत दरेकसामध्ये आहे. या ग्रामपंचायतीमध्ये दरेकसा सोडून डहाराटोला, दलदलकुही वंजारी या गावाचा समावेश असून मुरकुडोह, दंडारीचे पाचही गाव वार्ड नं.२ मध्ये येत आहे. या वॉर्डात घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून तेथील ग्रामपंचायत सदस्यांनी अनेक वेळा मागणी केली. दरम्यान काही घरकुल शासनाकडून मंजूर झाले परंतु प्रत्यक्षात बनलेच नाही.

Web Title: 40% of families still live under a thatched roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.