जिल्हाभरात इच्छुकांचे ३८५५ नामांकन दाखल

By Admin | Updated: July 12, 2015 01:39 IST2015-07-12T01:39:01+5:302015-07-12T01:39:01+5:30

जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह काही ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक येत्या २५ जुलै होत आहे.

3855 nominations filed in the district | जिल्हाभरात इच्छुकांचे ३८५५ नामांकन दाखल

जिल्हाभरात इच्छुकांचे ३८५५ नामांकन दाखल

देवरी/गोंदिया : जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह काही ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक येत्या २५ जुलै होत आहे. त्यासाठी शेवटच्या दिवशीपर्यंत उमेदवारांनी ३८५५ नामांकन दाखल केले. आॅनलाईन नामांकन दाखल करताना ग्रामीण भागातील उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली. शेवटच्या दिवशी आॅफलाईन नामांकन घेण्यात आले.
जिल्ह्यात गोंदिया तालुक्यात २८ ग्रामपंचातीत सार्वत्रिक तर एका ठिकाणी पोटनिवडणूक, तिरोडा तालुक्यात १९ सार्वत्रिक व एक पोटनिवडणूक, आमगाव तालुक्यात २३ सार्वत्रिक व एक पोटनिवडणूक, सालेकसा तालुक्यात ९ सार्वत्रिक व एक पोटनिवडणूक, देवरी तालुक्यात २९ सार्वत्रिक तर ३ ठिकाणी पोटनिवडणूक, सडक अर्जुनी तालुक्यात १९ सार्वत्रिक व एक पोटनिवडणूक, गोरेगाव तालुक्यात २६ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
देवरीत उमेदवारांची झुंबड
देवरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक व ३ ग्रामपंचायतीच्या पोटनीवडणुकीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी तहसील कार्यालाजवळ मोठी गर्दी केल्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरुप आले होते. शेवटच्या वेळेपर्यंत हजारो अर्जाची विक्री झाली होती. तर दि.१० जुलैच्या शेवटच्या वेळेपर्यंत ५२९ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यात अनेकांना आॅनलाईन अर्ज भरले आहेत. शक्रवारी शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज आले. तालुक्यातील ५६ पैकी २९ ग्रामपंचायतीच्या ९३ प्रभागांतून एकुण २६० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते, नेतेमंडळी, सुचक-अनुयोदक असा लवाजमा घेवून तहसील कार्यालयात येत होते. अशीच गर्दी इंटरनेट कॅफे, महाईसेवा केंद्र यांच्या दारातही होती.
आॅनलाईन अर्ज भरताना वेळ लागत असल्याने तांत्रिक अडचणी उद्भवल्या. तसेच बँकेचे नवीन पासबुक, कागदपत्रांची पुर्तता यामुळे इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्तेही भेटकुटीस आल्याचे चित्र दिसत होते. निवडणुक विभाग तहसील कार्यालयामध्येच असल्याने तेथे प्रचंड गर्दी उसळली होती. राखीव गटातुन उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी विभागातुन प्रस्ताव दाखल केल्याचे टोकण आणने बंधनकारक असल्याने त्यांचीही धावपळ उडाली. ही निवडणुक ग्रामीण स्तरावर असल्याने ग्रामीण भागातीप गरीब जनता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे होत आहेत. परंतु त्यांची देवरी येथे आर्थिक पिळवणूक होत होती. स्टॅम्प पेपर विक्रेत्यांकडून लूट झाली.

Web Title: 3855 nominations filed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.