दोन महिन्यात ३८ हजार ८१४ प्रवासी वाढले
By Admin | Updated: June 16, 2016 02:19 IST2016-06-16T02:19:49+5:302016-06-16T02:19:49+5:30
शाळेच्या सुट्या, लग्नसराई, उन्हाळी पर्यटन यामुळे उन्हाळ्याच्या उकाड्यातही रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावल्या.

दोन महिन्यात ३८ हजार ८१४ प्रवासी वाढले
गतवर्षाची तुलना : ४८ लाख ३१ हजार ३६५ रूपयांची रेल्वेच्या उत्पन्नात भर
गोंदिया : शाळेच्या सुट्या, लग्नसराई, उन्हाळी पर्यटन यामुळे उन्हाळ्याच्या उकाड्यातही रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावल्या. यावर्षी एप्रिल व मे महिन्यांच्या सुट्यात गेल्यावर्षीपेक्षा प्रवासी संख्या वाढली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत रेल्वेला या दोन महिन्यात ४८ लाख ३१ हजार ३६५ रुपये अधिकचे उत्पन्न मिळाले.
बाहेरगावच्या प्रवासासाठी सर्वात स्वस्त व चांगले माध्यम म्हणून रेल्वेकडे बघितले जाते. यावर्षी एप्रिल महिन्यात मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत दोन हजार ८६० व मे महिन्यात ३५ हजार ९५४ अधिकच्या संख्येने प्रवाशांनी रेल्वे गाडीने प्रवास केला. त्यामुळे एप्रिल महिन्यात २७ लाख ९५ हजार ४५३ रूपये व मे महिन्यात २० लाख ३५ हजार ८१२ रूपयांचे अधिकचे उत्पन्न गोंदिया रेल्वे स्थानकाला तिकीट विक्रीतून झाले. एकूण ४८ लाख ३१ हजार ३६५ रूपयांचे अधिकचे उत्पन्न दोन्ही महिन्यांत तिकीट विक्रीतून झाले आहे.
मे २०१५ मध्ये एकूण ६ लाख ४३ हजार ७६० तिकिटे गोंदिया रेल्वे स्थानकातून विक्री झाले. तर एप्रिल २०१६ मध्ये तिकीट विक्रीची संख्या वाढून ६ लाख ४६ हजार ६२० झाली. (प्रतिनिधी)