३५२ बालकांना रोजगार प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 00:51 IST2017-04-25T00:51:27+5:302017-04-25T00:51:27+5:30
पूर्व विदर्भातील केवळ गोंदिया जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने शिक्षण सोडून ....

३५२ बालकांना रोजगार प्रशिक्षण
गोंदिया : पूर्व विदर्भातील केवळ गोंदिया जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने शिक्षण सोडून जीवनापासून निराश झालेल्या एक हजार ६२१ बालकांच्या जीवनात आनंद भरला. यापैकी अनेक मुले आता शहाणे होवून आपल्या पायावर उभे होवून स्वावलंबनाचे जीवन गजत आहेत. तसेच आता त्यांनी सकारात्मक दृष्टिकोण ठेवून आपल्या कुटुंबाची आधारशक्ती ठरले आहेत.
सन २००२-०३ दरम्यान आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यात श्रमिकांच्या शिक्षण सोडलेल्या बालकांना पुन्हा शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी एक योजना सुरू करण्यात आली. ज्या जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली त्यात विदर्भातील अमरावती व गोंदिया जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यात त्यावेळी मोठ्या संख्येत बीडी कारखाने बाकीच होते. त्यामुळे धोकादायक उद्योगात कार्यरत श्रमिकांच्या बालकांसाठी विशेष शिक्षण-प्रशिक्षण केंद्र उघडण्याची योजना होती. त्यावेळी गोंदिया जिल्ह्यात ४० विशेष शिक्षण प्रशिक्षण केंद्र उघडण्याची मंजुरी मिळाली. परंतु एवढे शिक्षण केंद्र उघडण्यात आले नाही. नंतर आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने या योजनांपासून आपले हात काढून घेतले. यानंतरही श्रम व रोजगार मंत्रालयाने सदर प्रोजेक्ट सुरूच ठेवले. सन २००६-०७ त सन २०१५-१६ पर्यंत एक हजार ६२१ बालके विशेष शिक्षण केंद्राच्या माध्यमाने शिक्षणाच्या मूळ प्रवाहात जुडले.
सन २०१६ मध्ये शाळाबाह्य बालकांचा एक सर्व्हेक्षण करण्यात आला. यात नऊ ते १३ वर्षे वयोगटातील २३२ व १४ ते १८ वर्षे वयोगटातील ३५२ मुले शाळा सोडून इकडेतिकडे भटकताना आढळले. नऊ ते१४ वर्षे वयोगटातील २३२ बालकांसाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय नवी दिल्लीला सात नवीन विशेष शिक्षण-प्रशिक्षण केंद्र उघडण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाच्या आधारावर सात नवीन शिक्षण केंद्र लवकरच सुरू केले जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात आधीपासूनच १२ विशेष प्रशिक्षण केंद्र चालविले जात आहेत. यात शिक्षण सोडलेल्या ३८६ मुलांना विशेष पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे.
सर्व्हेक्षणात आढळलेल्या १४ ते १८ वर्षे वयोगटातील ३५२ शाळाबाह्य मुलांना रोजगाराचे प्रशिक्षऽ देवून त्यांना आपल्या पायावर उभे करण्याच्या दृष्टिनेसुद्धा एक प्रस्ताव बनविण्यात आला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हा कौशल्य व विकास विभागाला पाठविण्यात आला आहे. यावर सकारात्मक पाऊल उचलण्यात आले तर सदर बलकांना रोजगाराचे प्रशिक्षण देवून त्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिला जावू शकतो. (प्रतिनिधी)
५०.७६ लाखांचा खर्च
गोंदिया जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने वार्षिक ५०.७६ लाख रूपये उपलब्ध करून दिले जात आहे. या निधीतून विशेष शिक्षण केंद्रात अध्ययनरत विद्यार्थ्यांना पुस्तके, बॅग उपलब्ध करून दिले जाते. केंद्राचे भाडेसुद्धा दिले जाते. कार्यालय व केंद्रात २४ कर्मचारी सेवा देत आहेत. त्यांचे वेतनसुद्धा याच निधीतून काढले जाते.
शिष्यवृत्ती व दुपारचे भोजन
विशेष शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी दुपारी भोजनाची व्यवस्था सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून व शिष्यवृत्तीची रक्कम गोंदिया जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून प्रदान केली जाते. यावर्षाच्या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
विशेष प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दोन वर्षांपर्यंत प्रशिक्षण दिल्यानंतर मुलांना त्यांच्या वयानुसार जवळील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश करून दिला जातो. बालकांचा शोध घेणे, त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करणे व नंतर त्याने नियमित शिक्षण ग्रहण करावे, यासाठीच आमचा प्रयत्न आहे.
-महेंद्र रंगारी,
प्रोजेक्ट डायरेक्टर,
राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समिती, गोंदिया.