३४ उमेदवारांचे नामांकन रद्द

By Admin | Updated: September 29, 2014 23:07 IST2014-09-29T23:07:07+5:302014-09-29T23:07:07+5:30

जिल्ह्याच्या चारही विधानसभा क्षेत्रात एबी फॉर्म जमा न करू शकणाऱ्या २२ उमेदवारांसह एकूण ३४ उमेदवारांचे नामांकन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता ९२ उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत.

34 nominations were canceled | ३४ उमेदवारांचे नामांकन रद्द

३४ उमेदवारांचे नामांकन रद्द

९२ उमेदवार अधिकृत : एबी फॉर्मअभावी २३ उमेदवार रिंगणाबाहेर
गोंदिया : जिल्ह्याच्या चारही विधानसभा क्षेत्रात एबी फॉर्म जमा न करू शकणाऱ्या २२ उमेदवारांसह एकूण ३४ उमेदवारांचे नामांकन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता ९२ उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत. त्यांना नामांकन मागे घेण्यासाठी अवघे दोन दिवस मिळणार आहेत. त्यामुळे एकूण किती उमेदवार रिंगणात राहतील याचे चित्र १ आॅक्टोबरला दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.
दि.२७ ला नामांकन दाखल करण्याची शेवटची संधी होती. त्या सर्व अर्जांची सोमवारी स्क्रुटनी करण्यात आली. त्यात प्रामुख्याने विद्यमान आमदार डॉ.खुशाल बोपचे आणि माजी आमदार रमेश कुथे यांच्यासह जिल्हा कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार शेंडे यांचे नामांकन रद्द झाले. त्यांनी पक्षाच्या नावावर नामांकन भरले होते. परंतू प्रत्यक्षात पक्षाचा एबी फॉर्म त्यांच्या नावावर आला नसल्यामुळे त्यांचे अर्ज रद्द झाले.
नामांकन रद्द झालेल्या इतर उमेदवारांमध्ये गोंदिया विधानसभा क्षेत्रातून गोविंद तिडके यांच्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्र नसल्यामुळे, शशिकांत कोहडे, गोवर्धन जायसवाल यांचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे त्यांचे नामांकन रद्द झाले. तसेच विनोद मेश्राम (पीरिपा) यांचेही नामांकन रद्द झाले. आता गोंदिया विधानसभा क्षेत्रात एकूण ३८ उमेदवार मैदानात उरले आहेत.
तिरोडा विधानसभा क्षेत्रात एबी फार्म जमा करू न शकणारे आ.खुशाल बोपचे (भाजपा), आनंदराव बडोले (बसपा) आणि नरेश शेंडे (बसपा) तसेच राधेलाल पटले, डॉ.योगेंद्र भगत आणि रोशन बडगे (तिघेही कांग्रेस) यांनासुद्धा एबी फॉर्म मिळू न शकल्यामुळे त्यांचे नामांकन रद्द झाले. मात्र पटले आणि योगेंद्र भगत हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तसेच श्रावण रहांगडाले यांचाही अर्ज रद्द झाला. त्यामुळे येथे २३ उमेदवार शिल्लक आहेत. आमगांव विधानसभा क्षेत्रात कल्लो दरजी (राष्ट्रवादी) हे पक्षाचा एबी फॉर्म भरू न शकल्यामुळे त्यांचे नामांकन रद्द झाले. येथे १० उमेदवार कायम आहेत.अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक १८ उमेदवारांचे नामांकन रद्द झाले. त्यात प्रमोद गजभिये (तृणमूल कांग्रेस), अजय लांजेवार, महेंद्र रंगारी, मंदिरा वालदे, विशाल शेंडे, कृष्णकुमार शेंडे, माणिक धनाडे, अजय कोटांगले, विशाखा साखरे (सर्व कांग्रेस), आनंद राऊत, मिलन राऊत (दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस), महेंद्र चंद्रिकापुरे (मनसे), सचिनकुमार नांदगाये (बसपा), भावेश कुंभारे (बहुजन मुक्ती पार्टी), पोमेश्वर रामटेके (भाजपा) हे एबी फॉर्म सादर करू शकले नाही. परंतू रामटेके व गजभिये अपक्ष म्हणून कायम आहेत. सूचकाअभावी मदन साखरे (अभा फॉरवर्ड ब्लाक) यांचा अर्ज रद्द झाला.

Web Title: 34 nominations were canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.