1634 जागांसाठी 3278 जणांनी अर्ज दाखल केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST2020-12-31T05:00:00+5:302020-12-31T05:00:23+5:30
राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने मागील पाच दिवसात केवळ ७४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने याची दखल घेत मंगळवारपासून ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज स्विकारले.

1634 जागांसाठी 3278 जणांनी अर्ज दाखल केले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस होता. एकूण १६३४ जागांसाठी बुधवारी (दि.३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तहसील कार्यालय आणि आपले सेवा केंद्रावर एकच गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३२७८ एकूण उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने मागील पाच दिवसात केवळ ७४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने याची दखल घेत मंगळवारपासून ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज स्विकारले. त्यामुळे तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
यामुळे प्रशासनाची सुध्दा काही काळ धावपळ उडाली होती. अर्जातील संपत्तीचा तपशिल भरण्यासाठी उमेदवारांना बरीच अडचण जात असल्याचे चित्र होते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपंत्री जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांची धावपळ झाली. रात्री ९ वाजतापर्यंत २५३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
रात्री उशीरापर्यंत स्विकारले उमेदवारी अर्ज
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असल्याने सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली होती. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झालेल्या सर्वच उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यात आले. त्यामुळे रात्री १० वाजेपर्यंत काही तालुक्यात उमेदवारी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरुच होती. त्यामुळे तहसील कार्यालय सुध्दा रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याचे चित्र होते.
१८ जानेवारी रोजी फैसला
जिल्ह्यातील एकूण १८९ ग्रामपंचायतच्या १६३४ जागांसाठी जिल्ह्यातील ३२७८ उमेदवारी अर्ज दाखल केले. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून यानंतर नेमके किती उमेदवार रिंगणात आहेत हे चित्र स्पष्ट होईल. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्यानंतर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.