एकाच दिवशी ३१ लाख पुस्तकांचे वाचन
By Admin | Updated: September 10, 2016 00:13 IST2016-09-10T00:13:01+5:302016-09-10T00:13:01+5:30
जिल्ह्यात दप्तर विरहीतदिन वाचन आनंद दिन म्हणून जिल्ह्यातील १६८४ शाळांमध्ये साक्षरतादिनी साजरा करण्यात आला.

एकाच दिवशी ३१ लाख पुस्तकांचे वाचन
नरेश रहिले गोंदिया
जिल्ह्यात दप्तर विरहीतदिन वाचन आनंद दिन म्हणून जिल्ह्यातील १६८४ शाळांमध्ये साक्षरतादिनी साजरा करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील २ लाख १६ हजार ३७० विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी ३१ लाख ६० हजार ३७३ पुस्तकाचे वाचन केले. गोंदियाच्या शिक्षण विभागाने केलेल्या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी युनिसेफच्या सदस्या विद्या कुळकर्णी यांनी गोंदिया गाठून त्यांनी शाळांना भेटी दिल्यात.
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात वाचन आनंद दिवसाला उदंड प्रतिसाद मिळाला. अवांतर वाचनाची प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी १० पुस्तके हाताळली. वर्ग १ ते १२ वी पर्यंतच्या जिल्ह्यातील १६८४ शाळांतील २ लाख १६ हजार ३७० विद्यार्थ्यांनी ३१ लाख ६० हजारापेक्षा अधिक पुस्तकाचे वाचन केले.
आमगाव तालुक्यातील २१ हजार ८५ विद्यार्थ्यांनी ३ लाख १६ हजार २७५ पुस्तकाचे वाचन केले, सडक-अर्जुनी तालुक्यातील १८ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी २ लाख ६३ हजार ६६२ पुस्तकाचे वाचन केले, तिरोडा तालुक्यातील २८ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी ४ लाख ३१ हजार ९२५ पुस्तकाचे वाचन केले, देवरी तालुक्यातील १८ हजार २०२ विद्यार्थ्यांनी २ लाख ३६ हजार ६२६ पुस्तकाचे वाचन केले, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ हजार ९४१ विद्यार्थ्यांनी ४ लाख १९ हजार १७४ पुस्तकाचे वाचन केले, सालेकसा तालुक्यातील १३ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी २ लाख ७ हजार ४६५ पुस्तकाचे वाचन केले, गोरेगाव तालुक्यातील २१ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी ३ लाख २१ हजार ९१ पुस्तकाचे वाचन केले. गोंदिया तालुक्यातील ६४ हजार २७७ विद्यार्थ्यांनी ९ लाख ६४ हजार १५५ पुस्तकाचे वाचन केले.